बांग्लादेशची राजधानी ढाक्यामधलं हे चित्र...इथं पुन्हा एकदा हिंसाचार उसळलाय. राजधानीत पोलिस आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशचे जवान मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आले आहेत. ढाक्यातील प्रवेशद्वारांवर अनेक चौक्या उभारण्यात आल्या आहेत आणि सार्वजनिक वाहनांची कसून तपासणी केली जातीय. शेख हसीना आणि त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांवरील आरोपांवर निकाल देण्याची तारीख निश्चित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणा भोवतीही सुरक्षा कडक करण्यात आलीय.
राजकीय तणावामुळे ढाक्यातील जनजीवन विस्कळीत झालय, जाळपोळ आणि बॉम्ब हल्ल्यांच्या घटना राजधानीबाहेर गाजीपूर आणि ब्राह्मणबारियासारख्या शहरांमध्ये घडल्या आहेत. सरकारने हिंसाचारासाठी अवामी लीग समर्थकांना जबाबदार धरलय.
बांगलादेशमध्ये युनूस सरकारविरुद्ध अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी बंड पुकारलय. ढाकामध्ये होणाऱ्या या निषेधात आतापर्यंत १७ बस जाळण्यात आल्या आहेत. ढाकामध्ये पाच ठिकाणी स्फोट झाल्याचे वृत्त आहे. शेख हसीना यांच्यावरील खटल्याचा निकाल लागणार असल्यानं अवामी लीगचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
बांग्लादेशात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकालासाठी तारीख ठरवली असून 17 नोव्हेंबरला निकाल सुनावला जाणार आहे. या खटल्यात शेख हसीनांसह माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि तत्कालीन पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांच्यावरही आरोप आहेत. हसीना आणि कमाल, दोघांनाही ‘फरार आरोपी’ घोषित करण्यात आलय. मुख्य सरकारी वकील मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी तिन्ही आरोपींना मृत्युदंड देण्याची मागणी केली आहे. 28 दिवस चाललेल्या सुनावणीत 54 साक्षीदारांनी साक्ष दिली. त्यांनी2024 च्या ‘विद्यार्थी आंदोलना’दरम्यान सरकारनं केलेल्या दडपशाहीचा तपशील मांडलाय.
दरम्यान निकालाच्या काही दिवस आधीच शेख हसीनांनी न्यायाधिकरणाला कंगारू कोर्ट म्हटलंय. हे न्यायालय त्यांच्या राजकीय शत्रूंच्या नियंत्रणाखाली आहे. मी आंतरराष्ट्रीय निरीक्षणाखाली, अगदी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात सुद्धा खटल्याला सामोरं जाण्यास तयार आहे, असा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे बांग्लादेशचं कोर्ट शेख हसीनांना शिक्षा करणार की त्यांची निर्दोष मुक्तता करणार? याकडेच साऱ्या जगाचं लक्ष्य लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.