Visuals showing the aftermath of the brutal killing of a Hindu man in Bangladesh’s Pirojpur district. saam tv
देश विदेश

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

Hindu Man Burnt Alive In Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हिंसाचार सुरूच आहे. पिरोजपूर जिल्ह्यात आणखी एका हिंदू व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली. पीडितेला घरात कोंडून जिवंत जाळण्यात आल्याचा आरोप आहे. व्हिडिओ समोर आलाय.

Bharat Jadhav

  • बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ

  • पिरोजपूर जिल्ह्यात पलाश कांती साहा यांची निर्घृण हत्या

  • घरात कोंडून जाळल्याचा गंभीर आरोप

बांग्लादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्या निर्घृण हत्येनंतर आता पिरोजपूर जिल्ह्यातील पलाश कांती साहा यांची हत्या करण्यात आलीय. भाजप नेते अमित मालवीय यांनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केली आहे.

भाजप नेत्याने आरोप केलाय की, २७ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 6 वाजता पिरोजपूर जिल्ह्यातील दुमुरिया गावात राहणाऱ्या इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या घरांवर हल्ले केले. हल्लेखोरांनी पलाश कांती साहा यांना त्यांच्या घरात कोंडले. त्यानंतर त्यांच्या घराला आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात घर जळताना आणि बाहेर उभे असलेले लोक रडताना दिसत आहेत.

याच जिल्ह्यातील पिरोजपूरमधील याच भागातील पश्चिम दुमुरीतला गावात अवघ्या एका दिवसाआधी दोन हिंदू कुटुंबांची पाच घरे जाळण्यात आल्याची घटना घडली होती. बांग्लादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचे दर्शवतात, असा आरोप भाजप नेत्याने केला आहे. अमित मालवीय यांनी पश्चिम बंगालमधील मालदा आणि मुर्शिदाबाद येथील सांप्रदायिक दंग्यांचा उल्लेख केलाय. त्यांनी दोन्ही दंगा बाबत तुलना केली आहे, त्या काळात हिंदूंची घरे निवडकपणे लक्ष्य करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Tourism : ट्रेकिंग, ऐतिहासिक ठिकाण अन् शांत निसर्ग; सातपुडा पर्वतरांगेत वसलाय 'हा' किल्ला, पाहाल मनमोहक विहंगम दृश्य

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

Nana Patekar Video : शाहिद-तृप्तीला उशीर, नाना पाटेकर वैतागून निघून गेले; 'O Romeo'च्या ट्रेलर लाँच दरम्यान नेमकं घडलं काय?

Aloo Tikki Recipe: नाश्त्याला बनवा चटपटीत अन् क्रिस्पी आलू टिक्की; ५ मिनिटांत होईल तयार

Mumbai Horror: मुंबईत विक्रृतीचा कळस, अडीच महिन्याच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT