Security personnel at the site in Rajbari district after reports of a Hindu youth being killed in mob violence. saam tv
देश विदेश

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

Hindu Youth Killed in Bangladesh : द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या राजबाडी जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एका हिंदू युवकाची जमावानं हत्या केली. काही दिवसांपूर्वीच एका कारखान्यात काम करणाऱ्या दीपू नावाच्या हिंदू तरुणाची हत्या झाली होती.

Bharat Jadhav

  • बांगलादेशात आणखी हिंदू तरुणाची हत्या

  • राजबाडी जिल्ह्यात जमावाकडून बेदम मारहाण

  • डेली स्टारच्या रिपोर्टमधून घटना उघड

बांगलादेशात हिंदू युवकाच्या हत्येची घटना ताजी असतानाच आणखी एका हिंदू तरुणाची जमावानं बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, बांगलादेशातील राजबाडी जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. गावकऱ्यांच्या एका गटानं हिंदू तरुणाला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच २७ वर्षीय दीपू चंद्र दास नावाच्या तरुणाची जमावानं हत्या केली होती. दीपू हा मैमनसिंहच्या भालुकामध्ये एका कापड निर्मितीच्या कारखान्यात काम करत होता. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत जमावानं बेदम मारहाण करून त्याची हत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकावून पेटवून दिला होता.

द डेली स्टारच्या वृत्तानुसार, पांग्शा सर्कलमधील एका पोलीस अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली. स्थानिकांच्या जमावाकडून एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. मारहाण झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्याचा मृत्यू झाला होता. अमृत असं मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी तो गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला पांग्शा उपजिल्हा हेल्थ कॉम्प्लेक्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी मृताच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडील पिस्तुल आणि गावठी बंदूक हस्तगत करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाच्या विरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल होते. त्यात हत्या प्रकरणही होते. स्थानिकांनी पोलिसांना माहिती देताना अनेक आरोप केले आहेत. तो कथितरित्या एका टोळीचा म्होरक्या होता. खंडणी वसुली आणि अन्य गुन्ह्यांमध्ये तो सामील होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेस एकटी, पुण्यात दादांमुळे मविआत बिघाडी

SCROLL FOR NEXT