Bangladesh MP Yandex
देश विदेश

Bangladesh MP: मोठी बातमी! बांगलादेशचे खासदार भारतात आल्यानंतर बेपत्ता, ३ दिवसांपासून शोधमोहिम सुरू

Rohini Gudaghe

बांगलादेशचे एक खासदार भारतात आल्यानंतर बेपत्ता झाले आहेत. कुटुंबीय आणि पक्षाचे कार्यकर्ते यांचा त्यांच्याशी मागील तीन दिवसांपासून कोणताही संपर्क झाला नसल्याचं समोर आलं आहे. त्यांचं शेवटचं ठिकाण बिहारमधील मुझफ्फरपूर येथे असल्याचं दाखवत आहे. बांगलादेशच्या जेनैदाह-४ मतदारसंघातील खासदार अनवारुल अजीम अनार हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत.

खासदार अनार (Bangladesh MP) यांचे स्वीय सहाय्यक अब्दुर यांनी दिलेल्या माहितीनुसार , खासदार अनार ११ मे रोजी उपचारासाठी भारतात आले होते. सुरुवातीचे दोन दिवस त्यांचा कुटुंबीय आणि पक्षातील सदस्यांशी संपर्क झाला होता. मात्र, मंगळवारपासून त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. त्यांचा व्हॉट्सॲप नंबरही संपर्कात (Bangladesh MP Missing In India) नाही. त्यांच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे कुटुंबीय आणि पक्षातील सदस्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. खासदार अनवारूल अझीम अनार (MP Anwarul Azim Anar ) यांची मुलगी मुमताहिन फिरदौस यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचा वडिलांचा मागील काही दिवसांपासून संपर्क झालेला नाही. वडिलांसोबत संपर्क साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या मोबाइल फोन नंबरचे शेवटचं लोकेशन बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये सापडलं आहे.

खासदार अनार यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे पक्षातील कार्यकर्ते चिंतेत आहेत. वडील बेपत्ता झाल्याची बातमी त्यांची मुलगी मुमतरीन हिने पत्रकार परिषदेत दिली आहे. याप्रकरणी तिने ढाका पोलिसांची (Anwarul Azim Anar Missing Update) मदत मागितल्याची माहिती लाईव्ह हिंदुस्थानच्या हवाल्यानुसार मिळत आहे. खासदार अनवारूल अझीम उपचारासाठी भारतात आले असता बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत आहे. डीबी पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटलंय की, ते खासदार अनार यांचा शोध घेण्यासाठी भारतीय पोलिसांसोबत काम करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT