Bangladesh : फेरीला भीषण आग; 32 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी Saam Tv
देश विदेश

Bangladesh : फेरीला भीषण आग; 32 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

बांगलादेशमध्ये पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक दुर्घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : बांगलादेशमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील एका फेरीला लागलेल्या आगीमध्ये ३२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या फेरीला आग लागली, त्यावेळेस फेरीत जवळपास १ हजार लोक होते, असे सांगण्यात येत आहे.

राजधानीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या झलकोटी (Jhalkoti) जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. फेरीला आग (Fire) लागल्यामुळे काही लोकांनी जीव वाचवण्याकरिता नदीमध्ये (river) उड्या मारल्या आहेत. मात्र, यावेळी त्यांचा देखील मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक पोलीस (Police) प्रमुख मोइनुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार की, "ओबिजान १० या ३ मजली फेरीला नदीच्या मध्यभागी आग लागली होती.

हे देखील पहा-

आतापर्यंत ३२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जळालेले लोक बघून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीमध्ये भाजल्याने बहुतांश लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही लोकांनी जीव वाचवण्याकरिता नदीत उड्या घेतले आहेत. यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या, प्राथमिक माहितीनुसार ही आग फेरीच्या इंजिनमध्ये लागल्याचे आढळून आले आहे.

मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. सध्या बचावकार्य (Rescue) सुरू आहे, असेही स्थानिक पोलीस प्रमुख मोइनुल इस्लाम यांनी सांगितले आहे. दरम्यान, या अगोदर जुलैमध्ये ढाका (Dhaka) येथील एका ६ मजली कारखान्यात आग लागली होती. या अपघातामध्ये (accident) ५२ जणांचा मृत्यू झाला होता, तर जवळपास ३० जण जखमी झाले होते. कारखान्याच्या वरच्या मजल्यावर ही आग लागली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT