Karnataka Hijab Ban,Siddaramaiah  SAAM TV
देश विदेश

Karnataka Hijab Ban: कर्नाटकात हिजाबवरील बंदी उठणार, काँग्रेस सरकारने केली मोठी घोषणा

Siddaramaiah News: कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हिजाबवरील बंदी लवकरच उठवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषणा केली आहे.

Satish Kengar

Karnataka Hijab Ban:

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हिजाबवरील बंदी लवकरच उठवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोषणा केली आहे. सिद्धरामय्या म्हणाले की, राज्यातील महिला हवे ते परिधान करू शकतात.

सोशल मीडियावर घोषणा करताना ते म्हणाले की, भाजपला पोशाख आणि जातीच्या आधारावर समाजात फूट पाडायची आहे. पण मी हिजाब बंदी मागे घेण्याची घोषणा केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

म्हैसूरमध्ये एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, आता हिजापवर बंदी नाही. महिलांना हवे ते परिधान करता येईल. ते म्हणाले की, मी बंदी उठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तुम्हाला काय खायला आवडते किंवा काय घालायला आवडते? हे तुमचे तुम्ही ठरवा. मी यात ढवळाढवळ का करावी? सिद्धरामय्या म्हणाले की, राज्यातील लोक त्यांच्या इच्छेनुसार कपडे परिधान करू शकतात. (Latest Marathi News)

दरम्यान, 2022 मध्ये भाजपच्या बोम्मई सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घातली होती. यानंतर विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली. पुढे कर्नाटक उच्च न्यायालयानेही ही बंदी कायम ठेवत इस्लाममध्ये हिजाब आवश्यक मानला जात नसल्याचे सांगितले. शैक्षणिक संस्थांमध्ये समान संहितेचे पालन करावे, असे न्यायालयाने म्हटले होते.

उच्च न्यायालयानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. शाळांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी म्हटले होते. दुसर्‍या न्यायमूर्तींनी म्हटले होते की, कपडे परिधान करणं ही निवडीची बाब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT