Rath Yatra in Ahmedabad Balcony collapse SAAM TV
देश विदेश

Ahmedabad Balcony collapse: अहमदाबादमध्ये रथयात्रेदरम्यान इमारतीची बाल्कनी कोसळली; अनेक जण जखमी, VIDEO समोर

Chandrakant Jagtap

Balcony Collapse During Rath Yatra in Ahmedabad VIDEO: अहमदाबादच्या दरियापूरमध्ये रथयात्रेदरम्यान (Jagannath Rath Yatra 2023) एका इमारतीची बाल्कनी तुटून कोसळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून आणि ५ जण जखमी झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात काही लोक इमारतीच्या वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीतून रथयात्रा पाहत असताना गर्दी झाल्याने बाल्कनी कोसळ्याचे दिसते आहे.

तसेच ही बाल्कनी कोसळी तेव्हा त्या खालच्या मजल्यावरील बाल्कनीतून रथयात्रा पाहणाऱ्या लोकांच्या अंगावर ती कोसळली. ओडिशासह देशातील अनेक भागांत आज रथयात्रा काढली जात आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्येही ही यात्रा अतिशय उत्साहात सुरू होती. मात्र या घटनेमुळे या रथयाक्षेला गालबोट लागलं.

भगवान जगन्नाथाची 146 वी रथयात्रा मंगळवारी सकाळी गुजरातच्या अहमदाबाद शहरात कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. यावेळी जगन्नाथाच्या दर्शनासाठी 18 किलोमीटर लांब मिरवणूक मार्गावर लाखो भाविकांनी गर्दी केली होती. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रथयात्रेत गुजरात पोलिसांनी प्रथमच संपूर्ण मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी 3D मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आणि कोणत्याही अनधिकृत ड्रोनचा वापर होणार नाही याची खात्री करण्यासाठी अँटी-ड्रोन तंत्रज्ञान देखील तैनात केले. (Breaking News)

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सकाळी सोन्याच्या झाडूने रथांचा मार्ग स्वच्छ करण्यासाठी 'पहिंद विधी' हा प्रतीकात्मक विधी केला. यानंतर भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या रथयात्रेला जमालपूर येथील 400 वर्षे जुन्या मंदिरातून सुरुवात झाली. (Marathi Tajya Batmya)

तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सकाळी मंदिरात मंगला आरती केली. तीन रथांव्यतिरिक्त मिरवणुकीत सुमारे 15 सजवलेले हत्ती, चित्ररथ आणि गायक-वादकांच्या 100 पथकांचा समावेश होता. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी आषाढ महिन्याच्या दुसऱ्या दिवशी आषाढी बिजेला ही रथयात्रा काढली जाते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT