अबब... हैद्राबादमध्ये विकला गेला तब्बल १९ लाखांचा लाडू! SaamTvNews
देश विदेश

Breaking : हैद्राबादमध्ये विकला गेला तब्बल १९ लाखांचा लाडू!

बाळापूर लाडू लिलावाला २४ वर्षांची परंपरा असून, गणेश विसर्जनाच्या दिवशी या लाडूचा लिलाव करण्यात येत असतो.

वृत्तसंस्था

हैद्राबाद : हैद्राबाद मधील प्रसिद्ध असणाऱ्या बाळापूर गणेश लाडूचा आज लिलाव पार पडला. या खुल्या लिलावात २१ किलोच्या लाडूसाठी एका व्यापाऱ्याने व तेलंगणातील विधानपरिषद आमदार रमेश यादव यांनी तब्बल १८.९० लाख रुपये मोजले आहेत. एवढ्या प्रचंड किमतीला हा लाडू खरेदी करून बोली जिंकल्याने त्यांनीं आनंद देखील व्यक्त केला आहे. मात्र, २१ किलोच्या लाडवासाठी जवळपास १९ लाख रुपये मोजल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे देखील पहा :

तेलंगणातील नाडरगुल येथील व्यापारी असणाऱ्या मेरी शशांक रेड्डी व रमेश यादव यांनी हा लाडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांना भेट दिला आहे. या लाडूसाठी १,११६ रुपयांपासून बोली सुरू झाली आणि काही मिनिटांतच लाखो रुपयांच्या घरात पोहचली.

गेल्या वर्षी, २०२० मध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाळापूर गणेश लाडू लिलाव पार पडू शकला नव्हता. २०१९ मध्ये पार पडलेल्या लिलावात याच लाडूसाठी सर्वाधिक १७.६० लाखाची बोली लागली होती. बाळापूर लाडू लिलावाला २४ वर्षांची परंपरा असून, गणेश विसर्जनाच्या दिवशी या लाडूचा लिलाव करण्यात येत असतो. १९९४ मध्ये पहिला लिलाव पार पडला होता. त्यावर्षीच्या लिलावात ४५० रुपयांची बोली लावण्यात आली होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

SCROLL FOR NEXT