Balaghat Plane Crash
Balaghat Plane Crash Saam tv
देश विदेश

Balaghat Plane Crash : मोठी बातमी! मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये चार्टर विमान कोसळलं; दोन पायलट जागीच ठार

अभिजीत घोरमारे

Plane Crash News : मध्य प्रदेशच्या बालाघाटमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बालाघाटमधील जंगताल चार्टर विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या बिरसी विमानतळावरील प्रशिक्षणार्थी विमान कोसळून पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाटमधील किरणापूर भागातील भुक्कूटोला येथे विमानाचा मोठा अपघात झाला आहे. या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

गोंदियातील (Gondia) बिरसी विमानतळावरून उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमानाला जवळच्या मध्य प्रदेशाच्या (Madhya Pradesh) बालाघाट जिल्ह्यात अपघात झाल्याची घटना घडली. यात पायलट आणि एक प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव पायलट मोहित तर महिला प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे नाव वरसुका असे आहे. विमान कोसळण्याची घटना शनिवारी दुपारी झाल्याची सांगण्यात येत आहे.

बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुक्कुटोला येथील घनदाट जंगलात अपघात घडला आहे. जवळ जवळ 100 फूट खोल दरीत विमानाचा मलबा सापडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच बालाघाट पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

दरम्यान, चार्टर विमानाने ठराविक वेळेच्या १५ मिनिटे आधीच उड्डाण केले होते. विमान जंगलात कोसळताच विमान जळून खाक झालं. अपघातानंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये २ पायलटांचा मृतदेह नजरेस आला नाही.

या अपघातातील मृत पायलटांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. या विमान कोसळण्यामागे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे की, एयरक्राफ्ट खराब झाल्यामुळे विमान कोसळले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : बारामतीत आज प्रचारसभांचा धुरळा उडणार, शरद पवार, अजित पवार जंगी सभा घेणार

Petrol Diesel Rate 5th May 2024: पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, तुमच्या शहरातील जाणून घ्या आजच्या किंमती

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्ट्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी सँडविच घरच्या घरी

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

Mumbai News: मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT