Bakra Eid 2024 Saam TV
देश विदेश

Bakra Eid 2024 : 7 लाख 50 हजार रुपयांचा बोकड बघा! अवघ्या 2 वर्षांचा, वजन 161 किलो, VIDEO

Goat Sold 7,50,000 : 7,50,000 रुपयांना विकलेला बोकड आहे तरी कुठला? त्याची किंमती किलोभर सोन्याहून जास्त का आहे? या सर्वांची माहिती या बातमीतून जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

जून महिन्यात १६ तारखेला बकरी ईद आहे. बकरी ईद निमित्त सर्वत्र बोकड खरेदी आणि विक्रिचा व्यापार वाढला आहे. अशात या बकरी ईदला एका बोकडाची थेट ७ लाख ५० हजार रुपयांना विकला गेला आहे. किलोभर सोन्याहून महाग असलेला हा बोकड मिळतो तरी कुठे आणि तो इतका महाग का आहे? याचीच माहिती या बातमीतून जाणून घेऊ.

कुठे खरेदी करात येईल

सात लाख पन्नास हजारांचा हा बोकड मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आहे. बकरी ईदच्या आधी बोकड लिलावात तो 7,50,000 रुपयांना विकला गेला आहे. या बोकडाचं वजन तब्बल 161 किलो आहे. अशी माहिती बकरी विक्रेता सय्यद शहाब अली यांनी दिली आहे.

देखभाल कशी केली

बकरी विक्रेता सय्यद शहाब अली यांनी सांगितलं की, त्यांनी हा बोकड १ वर्ष आधी आणला होता. हा बोकड फक्त २ वर्षांचा आहे. आधी तो राजस्थानच्या जंगल परिसरात होता. त्यानंतर सय्यद शहाब अली यांनी त्याला आपल्याकडे आणलं. त्याची भरपूर देखभाल केली. योग्य पद्धतीने खाण्यापिण्याची सर्व काळजी घेतल्याने आज बोकडाची किंमती एवढी वाढली आहे, असं विक्रेत्यांनी सांगितलंय.

सय्यद शहाब अली यांच्याकडे अनेक विविध प्रकारचे बोकड आहेत. त्यांच्याकडे काश्मिरी बोकड देखील आहेत. सय्यद सुरुवातीला फक्त स्वत:साठी बोकड पाळायचे. मात्र नंतर त्यांनी हा व्यावसाय सुरू केला. गेल्या २० वर्षांपासून त्यांचा हा व्यावसाय सुरळीत सुरू आहे. बोकडांच्या देखभालीसाठी त्यांनी काही व्यक्तींनाही कामावर ठेवलं आहे.

बकरी ईद निमित्त 7,50,000 रुपयांना विकला गेलेला हा बोकड कसा दिसतो ते तुम्ही या व्हिडिओमधून पाहू शकता. पीटीआयने हा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. तसेच यावर बोकड मालकाची मुलाखत देखील घेण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' फोटोमध्ये लपलाय एक मोबाईल; ९९ टक्के लोकं शोधू शकले नाहीत!

Governmemt Job: सरकारी नोकरी अन् ८१००० रुपये पगार; BRO मध्ये ४६६ रिक्त पदांवर भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: मराठा उमेदवार ओळखा, कसब्यात लागले बॅनर

Solapur Politics: ...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही, शरद पवार गटाच्या नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

SCROLL FOR NEXT