Baba Vanga Future Prediction saam Tv
देश विदेश

Baba Vanga : अखेर ज्वालामुखीचा उद्रेक! नवीन बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरली खरी, वाचा सविस्तर

baba vanga predictions : नवीन बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जपानच्या रियो तात्सुकी यांच्या भाविष्यवाणीनुसार काही घटना घडत आहेत. त्यामुळे जुलै महिन्याचा अनेकांनी धसका घेतलाय. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

मानव नेहमीच भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. मग ते स्वत:विषयी असू दे किंवा जगाविषयी... सध्या बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानच्या रियो तात्सुकी यांच्या भविष्यवाणीचीही सर्वत्र चर्चा आहे. 5 जुलै नंतर जपानमध्ये मोठं संकट येणार अशी भविष्यवाणी रियो तात्सुकी यांनी केली होती. आता ही भविष्यवाणी खरी होताना दिसत आहे. जपानला वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा बसलाय...माणसांना उभं राहणंही शक्य नव्हतं...गाड्याही हवेत मागे मागे जात होत्या. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे वाहनेही पाण्याखाली गेलीत. त्यातच रियो यांनी ज्वालामुखी असल्याचा इशारा दिला होता. आणि आता ते ही प्रत्यक्षात आलं.

अखेर ज्वालामुखीचा उद्रेक !

हवाई येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. हवाई हे उत्तर अमेरीकेतील राज्य असून एक बेटसमूह आहे. हवाईच्या बिग आयलंडवरील माउंट किलौआ ज्वालामुखीचा उद्रेक झाला. सलग नऊ तास उद्रेक सुरू होता. त्यातून 1200 फूट उंचीपर्यंत लाव्हाचे फवारे बाहेर पडत होते.

रियो तात्सुकी जपानी मंगा कलाकार आहेत. त्यांच्या 1999 च्या "द फ्युचर आय सॉ" या पुस्तकात त्यांनी भविष्यातील अनेक घटनांचा उल्लेख केला.

जपान आणि फिलीपिन्स दरम्यान समुद्राच्या तळातील भेगा 2011 च्या तोहोकू भूकंपापेक्षा मोठ्या लाटा निर्माण करतील

2030 मध्ये विषाणूंचा मोठा धोका असल्याचा इशाराही दिला आहे.

रियो तात्सुकींनी 5 जुलैला जपानमध्ये भीषण त्सुनामी येईल, अशी भविष्यवाणी केली होती मात्र ती यावेळी प्रत्यक्षात आलेली नसली तरी ती 15 वर्षांच्या चक्रानुसार प्रत्यक्षात येतील असं सांगितल जातंय. त्यामुळे नवीन बाबा वेंगाची या भाकितांचा धसका भविष्यातही कायम राहणार हे नक्की

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात मुसळधार, पण बुलडाण्यात पावसाची दडी

Kidney disease: किडनी खराब होण्याआधी शरीर देतं हे ५ धोकादायक इशारे; क्रिएटिनिन वाढण्याचं खरं कारण जाणून घ्या

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

Goa Fort : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

SCROLL FOR NEXT