Dhanshri Shintre
समुद्राचं पाणी खारट का असतं? यामागे काय विज्ञान आहे, हे जाणून घेणं नक्कीच रंजक ठरेल.
समुद्राचे पाणी खारट असण्याचे प्रमुख कारण म्हणजे पावसामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या नद्या खारट खनिजं समुद्रात आणतात.
पावसाचे पाणी जमिनीवर आणि खडकांवर पडल्यावर खनिजं विरघळतात आणि नद्यांमार्फत थेट समुद्रात पोहोचतात.
खडकांमध्ये विविध क्षार असतात ज्यामध्ये सोडिअम, क्लोराइड, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम यांचा समावेश होतो.
पावसाचे पाणी खडकांतील खनिजे आणि मीठ वाहून नेतं आणि शेवटी ते सर्व समुद्रात मिसळून जातं.
समुद्रात वाहून आलेलं मीठ तळाशी साचतं आणि तिथेच मोठ्या प्रमाणात जमा होतं, त्यामुळे पाणी खारट राहतं.
समुद्राचे पाणी खारट असण्यामागे हे प्रमुख कारण असून, यामुळेच समुद्रात मिठाचे प्रमाण कायम जास्त राहते.
सोडिअम व क्लोराइड या दोन्ही प्रकारच्या मिठाचा उपयोग रोजच्या स्वयंपाकात चव वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.
समुद्रतळातील ज्वालामुखी उद्रेक आणि हायड्रोथर्मल वेंट्स खनिजे सोडतात, त्यामुळे समुद्रातील मिठाचे प्रमाण अधिक वाढते.