chulivarcha baba Saamtv
देश विदेश

Viral Video: काय बोलायचं आता! मटण, चिकननंतर आता आले चुलीवरचे बाबा; VIDEO पाहून नेटकरीही चक्रावले; चक्क पेटलेल्या...

Social Media Viral Video: सोशल मीडियावर सध्या या बाबांची तुफान चर्चा पाहायला मिळत असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Gangappa Pujari

Baba Sit On The Stove Viral Video: सध्या वेगवेगळ्या महाराजांच्या, साधू बाबांच्या चमत्काराच्या अनेक चर्चा आपल्या कानावर येत असतात. सामान्य माणसाला कधीही विश्वास बसणार ही अशा अनेक गोष्टी हे बाबा करत असतात. ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नावाची जोरदार चर्चाही पाहायला मिळत असते. सध्या अशाच एका बाबांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

ज्याच कारणही अगदी खास आहे. इतर बाबांपेक्षा हटके गोष्टीमुळे हे बाबा चांगलेच चर्चेत आले आहेत. म्हणूनच त्यांना चुलीवरील बाबा असे नावही नेटकऱ्यांनी दिले आहे. काय आहे या खास बाबांची गोष्ट चला जाणून घेवू... (Viral Video)

सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या बाबांच्या बातम्या ऐकायला मिळत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. जे बघून लोक हैराण होतात. काही बाबा अनेक महिने एकाच पायावर उभे असतात तर काही बाबा अजिबात झोपत नाहीत. कुणी कपडे घालत नाहीत तर काही बाबा आजार दूर करण्याचा दावा करतात. यातच एका नव्या बाबाचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. ज्यात हा बाबा एका जळत्या चुलीवर बसलेला आहे.

या व्हायरल व्हिडिओने नेटकरीही चक्रावले आहेत. कारण बाबा लोखंडी ताव्यावर ज्याच्याखाली आग पेटली आहे त्यावर बसला आहे. चुलीमध्ये आग इतकी लागली आहे की, सहजपणे भाकरी आणि पोळ्या भाजल्या जातील. बाबाजवळ त्यांचे भक्त येऊन आशीर्वाद घेताना दिसत आहेत. तुम्ही बघू शकता की, बाबा धोतर घालून आणि विडी पित तापलेल्या ताव्यावर बसले आहेत

ही चूल पूर्णपणे पेटवलेली असून हा बाबा त्यावर निवांत बसला आहे. आगीमुळे चटका बसत असल्याचे कोणतेही भाव या बाबाच्या चेहऱ्यावर दिसत नाहीयेत. पांढरं धोतर घातलेला हा बाबा बिडी ओढताना दिसत आहे. अनेक लोक त्याच्या जवळ येऊन त्याचा आशिर्वाद घेत आहेत.मात्र हा बाबा त्यांना शिव्या देत आहे.

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून चुलीवरचं मटण, मिसळ, आइसक्रीमनंतर आता चुलीवरचे बाबा बाजारात आले आहेत, अशा मजेशीर कमेंट्सही या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला 62 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पती स्नॅक्स आणायला विसरला आणि पत्नीने केला चाकूहल्ला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार

Fact Check: सतत नोकरी बदलताय? तर भरावा लागणार लाखो रुपयांचा दंड; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra politics : कोकाटेंचं सेंड ऑफ होणार? अजित पवारांकडून आमदारांसाठी आज स्नेह भोजन

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा २०,००० रुपये

SCROLL FOR NEXT