BABA RAMDEV'S GEN Z REMARK SPARKS CONTROVERSY saam tv
देश विदेश

जेन झी'चे अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड्स, बाबा रामदेव पुन्हा बरळले

Baba Ramdev Again Targets Gen Z's Lifestyle: बाबा रामदेवनी GEN Z बद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलयं...GEN Z च्या वैयक्तिक आयुष्य़ावर बोलताना रामदेव बाबा काय म्हणाले... बाबा रामदेव यांच्या विधानावर काँग्रेस कशी आक्रमक झालीय...पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

जेन झींनी एकत्र येऊन भारताला बदनाम केलं, असं वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडलेत...जेन झी आंदोलनावर बोलताना बाबा रामदेव यांनी थेट तरुणांच्या खाजगी आयुष्याबाबत आणि जीवनशैलीबद्दल नवा दावा केलाय....जेन झींना अनेक बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड्स असतात, असं म्हणत बाबा रामदेव यांनी तरुणाईबद्दल वादग्रस्त विधान केलयं... काँग्रेसनं बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त विधानावर जोरदार टीका केलीय...

एकीकडे तरुणांबद्दल वादग्रस्त विधान करत असतानाच दुसरीकडे बाबा रामदेव यांनी तरुणांच्या समस्येबद्दल सरकारालाच थेट इशारा दिलाय... देशातल्या समस्या सोडवा अन्यथा आंदोलन करावं लागेल, असा पवित्रा बाबा रामदेवनं घेतला...तर मोदी शाह सत्तेतून पायउतार होणार असल्यानं रामदेव बाबांनी भूमिका बदलल्याची टीका राऊतांनी केलीय...

एकीकडे रामदेव बाबांच्या पतंजलीचे काही उत्पादने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. त्यावरुन टीका होत असतानाच बाबा रामदेव जेन झीसोबत आंदोलन करणार असल्याचं सांगताय़त. मात्र एकीकडे तरुणांना दोष द्यायचा आणि दुसरीकडे तरुणांचे गुणगान करायचे या बाबा रामदेव यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे संताप व्यक्त होतोय. वैचारिक डोस देण्याच्या नावाखाली तरुणांना डिवचण्याचा अधिकारी बाबा रामदेव यांच्यासारख्या ढुढ्ढाचार्यांना कुणी दिला? हा खरा प्रश्न आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT