Ramlala Darshan  Saam Tv
देश विदेश

Ayodhya Ram Mandir: सर्वांना मिळणार रामललाचे दर्शन; दररोज मिळणार २४०० पास, जाणून घ्या सर्व प्रोसेस

Ramlala Darshan : आता रामदर्शनासाठी भक्त थेट रांगेत प्रवेश करू शकतील. भाविक कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू न बाळगता आराध्याचे दर्शन घेऊ शकतात. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी दररोज २४०० पास जारी केले जातील. पासधारकांसाठी दर्शनाची वेळही निश्चित केली जाणार आहे.

Bharat Jadhav

Ayodhya Ramlala Darshan Passes:

अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर रामभक्त रामललाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. आतापर्यंत लाखो भाविकांनी रामदर्शन घेतले आहे. देशभरातील भाविक रामललाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जात आहेत. यातच आता राम मंदिरात रामलला प्रभूंचे दर्शन घेणे अजून सुलभ आणि सोपं होणार आहे. श्रीराम मंदिर ट्रस्टकडून भाविकांसाठी नवी व्यवस्था सुरू करत आता दररोज २४०० पास देण्यात येण्याचा निर्णय घेतलाय.(Latest News)

आता राम दर्शनासाठी भक्त थेट रांगेत प्रवेश करू शकतील. भाविक कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू न बाळगता आराध्याचे दर्शन घेऊ शकतात. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी दररोज २४०० पास जारी केले जातील. पासधारकांसाठी दर्शनाची वेळही निश्चित केली जाणार आहे. पासधारकांना ६ टप्प्यांमध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन, पूजन करण्याची संधी मिळेल. प्रत्येक टप्प्यात ३०० पास आणि १०० स्पेशल पास दिले जाणार आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्रीराम भक्तांना सहज दर्शन घेता यावे, यासाठी दोन-दोन तासांच्या बॅच निश्चित करण्यात आल्यात. एका दिवसात ६ टप्प्यात रामदर्शन करता येणार असल्याचं श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कॅम्प ऑफिस प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले.

अशी असेल वेळ

पहिला टप्पा सकाळी ७ ते ९, दुसरा ९ ते ११, तिसरा १ ते ३, चौथा ३ ते ५, पाचवा ५ ते ७ आणि शेवटचा सहावा ७ ते ९ अशी व्यवस्था असेल. यामध्ये विशिष्ट पास देण्यात येतील. प्रत्येक टप्प्यात ४०० पास दिले जातील. यातील ट्रस्ट आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी १०० पास राखीव असतील. ३०० पासांपैकी २०० पास ऑनलाइन दिले जातील आणि १०० पास काउंटरवर मिळतील.

बंद ठेवलं होतं राम मंदिर

रामलला यांना विश्रांती मिळत नसल्याीने दुपारी १२ ते १ या वेळेत रामदर्शन थांबवण्यात आले होते. रामलला प्रभूंना आराम मिळत नसल्यामुळे राम मंदिर ट्रस्टकडून यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार होता. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर प्रथमच रामदर्शन दिवसभरात काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग

Railway Exam Rules: रेल्वे परीक्षेच्या नियमात मोठा बदल; पेपरवेळी परीक्षार्थींना 'या' गोष्टीची असणार मुभा

Ind Vs Eng 3rd Test : रिषभ पंत पाठोपाठ केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदरही तंबूत; लॉर्ड्सचा कसोटी सामना भारताच्या हातून निसटला?

Jalna News: अरे बापरे...! दारू प्यायलेला मुख्याध्यापक डुलक्या देत वर्गातच झोपला अन् तिथेच... व्हायरल Video पाहाच

Supreme Court : नवरा-बायकोच्या खासगी कॉल रेकॉर्डिंगचा पुरावा ग्राह्य धरला जाणार; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT