Tamil Nadu Auto Driver killed  Saam tv
देश विदेश

Tamil Nadu crime : एकीकडे मित्र बर्थडे केक कापत होता, दुसरे मित्र रिक्षावाल्याला भोसकत होते; भयंकर घटनेने खळबळ

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Tamil Nadu Auto Driver Killed : तामिळनाडूमधील अंबत्तुरमध्ये गुरुवारी रात्री धक्कादायक घटना घडली. रस्ता अडवून वाढदिवस साजरा करताना हटकल्याने एका २५ वर्षीय रिक्षाचालकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आठ ते दहा जण रस्त्यावरच वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी रिक्षाचालकाने त्यांना हटकले. रस्ता अडवू नका असं तो या टोळक्याला म्हणाला. त्याचा राग आल्यानं टोळक्यानं त्याला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. (Crime News)

कामेश (वय २५) असं हत्या झालेल्या रिक्षाचालकाचं (Auto Driver) नाव आहे. अंबत्तुरमधील व्यंकटेश्वर नगरमध्ये तो राहत होता. मित्राची रिक्षा घेऊन तो जात होता. या मारहाणीत कामेशचा भाऊ सतीश (वय २९) हा जखमी झाला आहे.

नेमकं काय घडलं?

कामेश गुरुवारी रात्री अंबत्तूर येथून आपल्या भावाला घेऊन रिक्षाने निघाला होता. त्याला घरी सोडायचे होते. साधारण साडेअकराच्या सुमारास कामेश रिक्षाने अयप्पन स्ट्रीट जंक्शनवर पोहोचला. त्याठिकाणी भर रस्त्यात आठ ते दहा जणांचे टोळके वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत होते. त्यांनी संपूर्ण रस्ता अडवून ठेवला होता.

कामेशने ते बघितले. त्याने रिक्षाचा हॉर्न वाजवला. रस्ता अरुंद असल्याने तो बराच वेळ हॉर्न वाजवत राहिला. त्या आवाजामुळे टोळक्यातील तरूण चिडले. त्यांनी कामेशशी वाद घातला. त्यांची बाचाबाची झाली. जोपर्यंत वाढदिवसाचा केक कापून होत नाही, तोपर्यंत थांबून राहा, असे त्यांनी कामेशला सांगितले.

कामेश आणि त्याचा भाऊ सतीश या दोघांनी त्यांना विरोध केला. रिक्षाला जायला वाट द्या असे त्यांनी सांगितले. त्यांच्यातील वाद वाढला. गौतम नावाचा तरूण त्याच्या वाढदिवसाचा केक कापत होता. दुसरीकडे त्याचे मित्र कामेशला चाकूने भोसकत होते. सतीशने कामेशला त्यांच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यावरही हल्ला केला. त्यानंतर सतीशने आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलावलं. ते येईपर्यंत टोळक्यानं कामेशवर पुन्हा हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहचले. कामेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी (Police) सतीशला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. अशा प्रकारे रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यास मनाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. दरम्यान, या प्रकरणी अंबत्तुर पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला असून, आठ जणांना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : निक्कीच्या प्रेमात अरबाजची तहान भूक हरपली, मनधरणी करत म्हणाला…

Relationship Tips : रोजच्या भांडणांमुळे नातं तुटण्याची भीती वाटतेय? आजपासून 'या' टिप्स नक्की फॉलो करा

IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

Marathi News Live Updates : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

SCROLL FOR NEXT