australian prime minister marriage  Saam tv
देश विदेश

आजोबा होण्याच्या वयात प्रेमात पडले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, १६ वर्षांहून लहान महिलेशी लग्न, VIDEO

australian prime minister marriage : आजोबा होण्याच्या ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान प्रेमात पडले. त्यांनी १६ वर्षांहून लहान महिलेशी लग्न केलं.

Vishal Gangurde

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचा ६२ व्या वर्षी जोडी हेडनसोबत विवाह

हेडन या पंतप्रधान अँथनी यांच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान

दोघांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, ते सार्वजनिक कार्यक्रमांत एकत्र दिसायचे.

Australia Prime Minister : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे शनिवारी पार्टनर हेडनसोबत विवाह बंधनात अडकले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान त्यांच्या कार्यकाळातच विवाहबंधनात अडकले आहेत. अँथनी अल्बानीज हे ६२ वर्षांचे आहेत. तर त्यांच्या पत्नी हेडन या ४६ वर्षांच्या आहेत. ऑस्ट्रेलियात १२४ वर्षांत प्रथमच पंतप्रधानपदावरील व्यक्तीने लग्न केलं आहे.

पंतप्रधान अल्बानीज यांनी निवासस्थानी असलेल्या बागेत लग्न केलं. पंतप्रधानांच्या सोहळ्याला त्यांचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. लग्नानंतर अल्बानीज यांनी सोशल मीडियावर विवाहित झाल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ देशील शेअर केला. या व्हिडिओमध्ये अल्बानीज यांनी हेडन यांचा हात पकडल्याचे दिसत आहे. त्यांनी २०२४ साली व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रपोज केला होता.

गेल्या काही वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसायचे. २०२२ साली झालेल्या निवडणुकीतही हेडन या अल्बानीज यांच्यासोबत प्रचार करत होत्या.

पंतप्रधान अल्बानीज यांचं दुसरं लग्न

लेबर पार्टीच्या विजयावेळी हेडन या पंतप्रधानांसोबत होत्या. लग्न झाल्यानंतर सोमवार ते शुक्रवारपर्यंत हनिमूनसाठी एका ठिकाणी रवाना होणार आहेत. अल्बानीज यांचा पहिल्या पत्नीशी २०१९ साली घटस्फोट झाला होता. त्यानंतर ५ वर्षांपूर्वी पंतप्रधान आणि हेडन यांची भेट एका कार्यक्रमात झाली होती. त्यानंतर दोघे प्रेमात पडून आज विवाहबंधनात अडकले.

पंतप्रधानांनी प्रपोज केल्यानंतर म्हटले होते की, मी माझे उर्वरित आयुष्य हेडनसोबत घालू इच्छित आहे, अखेर मला अशी जोडीदार मिळाली आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, जोडप्याने स्वत:च लग्नाच्या शपथ लिहून घेतल्या. या सोहळ्यात सेरेमोनियल अधिकाराऱ्याने लग्नाची विधी पार पडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Childhood Cancer: पालकांनो! मुलांमध्ये दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; कॅन्सरचा असू शकतो सुरुवातीचा संकेत

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT