One of the armed attackers seen carrying a gun and ammunition during the Bondi Beach shooting in Sydney. saam tv
देश विदेश

Sydney Mass Shooting: हातात बंदुक, कंबरेला काडतुसांचा पट्टा; बॉन्डी बीचवर गोळीबार करणाऱ्या एका हल्लेखोराचा फोटो आला समोर

Bondi Beach Attack: सिडनीमधील गोळीबाराच्या हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे तर ११ जण जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात एक हल्लेखोर जखमी झालाय. हल्लेखोरांपैकी एकाचा फोटो समोर आला आहे.

Bharat Jadhav

  • सिडनीच्या बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली.

  • या हल्ल्यात १० ते १२ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी झाले.

  • दोन बंदूकधारी हल्लेखोरांनी ज्यू समुदायाच्या कार्यक्रमावर हल्ला केला.

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध बॉन्डी बीच अंदाधूंद गोळीबार झाल्याची घटना घडलीय. दोन बंदुकधाऱ्यांनी ज्यू समुदायाच्या लोकांवर ताबोडतोब गोळीबार केला. यानंतर तेथे नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरवैर पळू लागले. दरम्यान या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितलं जात आहे. गोळीबार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी हल्लेखोरांना चोख प्रत्त्युत्तर दिलं. याचदरमयान एका हल्लेखोराचा फोटो समोर आलाय. या फोटोमध्ये या हल्लेखोराकडे बंदूकीसह काडतुसांचा मोठा साठा असल्याचे दिसत आहे.

हल्लेखोर गोळ्यांनी सज्ज असल्याचे दिसून आले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार,ऑस्ट्रेलियन पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर जखमी झाला.तर दुसरा एकाल कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. सिडनी पोलिसांनी परिसराला घेराव घातला आहे आणि शोध मोहीम सुरू केली आहे.

एका हल्लेखोराची ओळख पटली

एका हल्लेखोराची ओळख पटली असून त्याचे नाव नवीद अक्रम असे आहे, वृत्तानुसार,अक्रमचं वय २४ वर्ष आहे. तो सिडनीच्या दक्षिण-पश्चिम उपनगरातील बॉनीरिग येथील (Bonnyrigg) रहिवासी आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अक्रमच्या हातात बंदूक दिसत आहे. त्यासह त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गोळ्याचा साठा होता. स्थानिक माध्यमांनुसार, नवीद अक्रम हा त्याच्या कुटुंबासह बोनीरिगमध्ये सुमारे एक वर्षापासून राहत होता. या हल्ल्याशी संबंधित मोठ्या कटाचे किंवा नेटवर्कचे पुरावे शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकलाय.

अनेक जखमींची प्रकृती गंभीर

सुरुवातीच्या तपासात हा हल्ला एकाकी हल्ला असल्याचे दिसून आले आहे. हा हल्ला कोणत्या संघटित दहशतवादी नेटवर्कने केलाय का याचा तपास एजन्सी करत आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले की, गोळीबारात नवीद अक्रमलाही गोळी लागली त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. घटनेनंतर, समुद्रकिनारा रिकामा करण्यात आला आणि जवळपासचे सर्व रस्ते बंद करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT