Sakshi Sunil Jadhav
दररोज वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटलीत बुरशी (मोल्ड) आणि जंतू वाढण्याची शक्यता असते. फक्त पाण्याने धुवून उपयोग होत नाही, योग्य पद्धतीने स्वच्छता करणं गरजेचे आहे.
शक्य असल्यास आठवड्यातून एकदा बाटली डिशवॉशरमध्ये धुवा. गरम पाणी आणि उच्च तापमानामुळे लपलेल्या जागाही नीट स्वच्छ होतात.
स्वच्छता करण्यापूर्वी उरलेले पाणी पूर्णपणे ओतून टाका. आतमध्ये कोणताही द्रव किंवा साठा राहू देऊ नका.
झाकण, स्ट्रॉ, स्लाइडर, सिलिकॉन गॅस्केट असे सर्व भाग वेगळे काढा. लहान कप्प्यांमध्येच जास्त जंतू साचतात, त्यामुळे प्रत्येक भाग स्वतंत्र धुणं आवश्यक आहे.
सर्व भाग आधी कोमट पाण्याने चांगले धुवा. यामुळे उरलेले अवशेष आणि दुर्गंधी कमी होते.
द्रव भांडी धुण्याचा साबण काही थेंब बाटलीत टाका. बॉटल ब्रश किंवा स्पंजच्या मदतीने आतील भाग आणि झाकण नीट घासून स्वच्छ करा.
झाकणाच्या कडांमध्ये आणि माउथपीसजवळ बॅक्टेरिया लपतात. या भागांना स्वतंत्रपणे स्वच्छ करून धुवा.
जास्त दिवस स्वच्छता नसेल केली तर व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण वापरा. काही वेळ तसेच ठेवून नंतर ब्रशने घासल्यास बुरशी नष्ट होते.
साबण किंवा व्हिनेगर बाटलीत राहू नये म्हणून सर्व भाग गरम पाण्याने पुन्हा एकदा नीट धुवा.
धुतल्यानंतर बाटली उलटी करून हवेत पूर्णपणे कोरडी होऊ द्या. ओलावा राहिल्यास पुन्हा बुरशी वाढू शकते.