australia Crime news melbourne-65-women-gets-used-condoms speed post know reason  Saam TV
देश विदेश

Crime News: इथल्या महिलांसोबत घडतंय भयंकर; पोस्टानं पाठवली जाताहेत वापरलेले कंडोम, नेमकं काय आहे प्रकरण

Australia Crime News: हे संतापजनक कृत्य कुणी केले याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून या घटना सातत्याने घडत असून यामुळे महिलांमध्ये घबराटीचं वातावरण आहे.

साम टिव्ही ब्युरो

Australia Crime News: ऑस्ट्रेलियातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. मेलबर्न शहरात राहणाऱ्या ६५ महिलांना अज्ञात व्यक्तीने वापरलेले कंडोम पोस्टाने पाठवले आहेत. एवढेच नाही तर त्यांच्यासोबत पत्रेही पाठवली आहेत. ही पत्रे आणि कंडोम मेलबर्नच्या पूर्व आणि दक्षिण-पूर्व भागात राहणाऱ्या महिलांना पाठवण्यात आले आहेत.  (Breaking Marathi News)

दरम्यान, हे संतापजनक कृत्य कुणी केले याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून या घटना सातत्याने घडत असून यामुळे महिलांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. विशेष बाब म्हणजे ज्या महिलांसोबत हे लाजिरवाणे कृत्य करण्यात आले आहे, त्या सर्व महिला कुठे ना कुठे एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने महिलांना टार्गेट करून हे कृत्य केलं आहे. याचे ठोस कारणही पोलिसांना सापडले आहे. वास्तविक, ज्या महिलांना आरोपीने पोस्टाने कंडोम पाठवले आहेत. त्या महिलांमध्ये एक गोष्ट समान आहे. (Latest Marathi News)

या सर्व महिलांनी 1999 मध्ये किलब्रेडा कॉलेज प्रायव्हेट गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते. या सर्वांचे पत्ते शाळेत नोंदणीकृत असून आरोपीने तेथून माहिती घेऊनच महिलांना पोस्टाने वापरलेले कंडोम पाठविण्यात आल्याचे समजते. सध्या मेलबर्नची 'बेसाइड सेक्शुअल ऑफेन्सेस अँड चाइल्ड अब्यूज इन्व्हेस्टिगेशन टीम' या प्रकरणाचा तपास करत आहे.

याबाबत पोलिसांनी एक निवेदनही जारी केले असून लवकरच आरोपी (Crime News) पकडला जाईल, महिलांनी काळजी करू नये, पोस्टाने आलेली वस्तू तपासून घ्या, असं निवेदनात म्हटलं आहेत. ऑस्ट्रेलियातील हेराल्ड सन वृत्तपत्राशी बोलताना पीडित महिलेने सांगितले की, तिला हस्तलिखित संदेशासह एक पत्र मिळाले आहे.

याबाबत त्याने आपल्या मित्रांशी बोलले असता त्यांनीही त्यांच्या घरी पत्र आल्याचे सांगितले. महिलेचे म्हणणे आहे की, पत्र मिळाल्यानंतर ती इतकी अस्वस्थ झाली होती की तिला रात्रभर झोप आली नाही. हे अत्यंत घृणास्पद आणि लज्जास्पद कृत्य असल्याचे तिने सांगितले. अनेक महिलांना अशा स्वरुपाची प्रत्येकी चार पत्रे मिळाली आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

SCROLL FOR NEXT