Ukraine: 'युक्रेनवर हल्ला केल्यास मोठी किंमत चुकवावी लागणार'; जो बायडन यांचा रशियाला इशारा Saam Tv
देश विदेश

Ukraine: 'युक्रेनवर हल्ला केल्यास मोठी किंमत चुकवावी लागणार'; जो बायडन यांचा रशियाला इशारा

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी काल परत एकदा रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनच्या (Ukraine) सीमेवरुन (border) सैनिकांना हटविण्याचे आदेश दिले आहे. तसेच, रशियाने युक्रेनवर हल्ला (Attack) केल्यास अमेरिका आणि इतर मित्र राष्ट्र रशियाला जोरदार प्रत्युत्तर देणार आहे आणि त्याची रशियाला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. (Attack on Ukraine Joe Biden warns Russia)

अमेरिकेच्या (America) राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जो बायडन व्लादिमीर पुतीन यांना सांगितले आहे की, युक्रेनवर हल्ला केल्यास याचा मानव जातीवर खूप मोठा परिणाम होणार आहे. तसेच या हल्ल्याने जगभरामध्ये रशियाची प्रतिमा मलीन होणार आहे. युक्रेन विषयावर दोघांमध्ये ६२ मिनिटे फोनवर चर्चा करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

बायडनच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने गुप्तचर माहितीचा हवाला देताना म्हणाले आहे की, रशिया काही दिवसामध्येच म्हणजेच बीजिंगमध्ये चालू असलेल्या शीत ऑलिम्पिक अगोदरच (20 फेब्रुवारी) हल्ला करू शकणार आहे. विशेष म्हणजे रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखाहून जास्त सैनिक जमा केले आहे. शेजारील बेलारुसमध्ये सरावाकरिता आपले सैन्य पाठवले आहे. (Attack on Ukraine Joe Biden warns Russia)

मात्र, आपण युक्रेनवर आक्रमण करणार असल्याचा रशियाने सतत नकार दिला आहे. यामध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पोलंडमध्ये ३ हजार अतिरिक्त अमेरिकन सैनिक पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व गोष्टीवर अमेरिका आणि रशिया कोणत्याही परिस्थितीमध्ये तयार असल्याचे दिसून आले आहे. बायडन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी युक्रेनमध्ये राहणाऱ्या सर्व अमेरिकन नागरिकांना युक्रेन सोडण्याचे आवाहन केले आहे.

रशियन हल्ल्यावर हवाई सेवा किंवा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यास अमेरिकन नागरिकांनी अमेरिकन सैन्य त्यांना बाहेर काढण्याची अपेक्षा करू नये, असा आग्रह त्यांनी यावेळी धरला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका रोमानियाच्या कॉन्स्टँटा येथील काळ्या समुद्राच्या बंदरावर लष्करी साहित्य आणि वाढीव सैन्य यावेळी तैनात करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT