'ऑपरेशन राइजिंग लॉयन'... शुक्रवारी पहाटे इराणच्या युरेनियम समृद्धीकरण केंद्र असलेल्या नतान्झ प्रकल्पावर इस्त्रायलने हल्ला केला. एवढंच नाही तर 200 विमानांनी 100 ठिकाणांवर एकाचवेळी हल्ला केला. मोसादने आधीच इराणमध्ये आत्मघातकी ड्रोन तैनात करुन ठेवले होते. तेहरानजवळील क्षेपणास्त्र अण्वस्त्र तळांवर योग्य वेळी साधून डागण्यात आली. सर्वाधिक सुरक्षा असणाऱ्या फरदोह अणुप्रकल्पालाही लक्ष्य केलं गेलं.
इराणच्या कोणत्या 6 लष्करी तळांवर हल्ला केलाय पाहूयात
तबरीज
करमानशाह
तेहरान
अराक
नतांज
इस्फहान
इराणच्या छुप्या अण्वस्त्र केंद्राची माहिती सात वर्षांपूर्वीच मोसादनं एक ऑपरेशन राबवून मिळवली होती.. इराण अणूबॉम्ब बनवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्यापुढे ऑपरेशन “रायजिंग लायन” सुरु करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं इस्त्रायलच्या लष्करी दलानं म्हटलंय. इस्त्राईलच्या हल्लात इराणचे सात प्रमुख अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञही मारले गेलेयत तर.तेहरानमधील निवासी भागात 78 जण ठार आणि 329 जण जखमी झालेयेत
इराणमध्ये प्रत्येक क्षणी मृत्यू दार ठोठावत आहे. अणुप्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या अणु किरणोत्सर्गामुळे विनाश होण्याची भिती व्यक्त होत आहे. मात्र या हल्ल्यात अणूप्रकल्पाचे सामान्य नुकसान झाल्याचा इराणचा दावा आहे. मात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने संयुक्त राष्ट्र संघाला दिलेली माहिती धक्कादायक आहे. रेडिएशन गळती होत आहे. ती सध्या अंतर्गत असून नियंत्रित केली जाऊ शकते, असं IAEA ने म्हटले आहे.
या हल्ल्यानंतर इराणही पेटून उठलंय. इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खोमेनी यांनी 'ट्रू प्रॉमिस 3' या मोहिमेतून बदला घेण्याचा संदेश देत इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला. १५० बॅलिस्टिक मिसाइल डागल्या. त्यामुळे जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये स्फोट झाले. इराणच्या हल्ल्यानंतर गाझामध्ये मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं. इस्त्राईलचं लष्करी सामर्थ मोठं असलं तरी इस्त्रायलचे आयरन डोम्स आणि डेव्हिड स्लिंग प्रणाली इराणी क्षेपणास्त्रांचा मारा सहन करण्यात अयशस्वी ठरल्याचं चित्र आहे. दुसरीकडे कोणत्याही देशाने इस्रायलला मदत केली तर त्यांच्या प्रादेशिक लष्करी तळांनाही लक्ष्य केले जाईल, असा इशाराच इराणने दिला आहे, जो अमेरिकेसाठीही थेट इशारा मानला जात आहे. मध्य पूर्वेतील या युद्धाची व्याप्ती अधिक वाढायला नको एवढीच अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.