Army File Photo Saam TV
देश विदेश

Breaking News : मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानाचा सहा सहकाऱ्यांवर गोळीबार, नंतर स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

Army Jawan Firing on 6 colleagues in Manipur : दक्षिण मणिपरमधील एआर बटालियन कॅम्पसमध्ये ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचा मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्ष किंवा हिंसाचाराशी संबंध नाही.

प्रविण वाकचौरे

Manipur News :

मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या (एआर) सैनिकाने बुधवारी त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला. गोळीबारात सहा जवान जखमी झाले. या घटनेनंतर आरोपी जवानाने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं आहे.

सर्व जखमी जवानांना चुराचंदपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण मणिपरमधील एआर बटालियन कॅम्पसमध्ये ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचा मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्ष किंवा हिंसाचाराशी संबंध नाही, अशी माहिती देखील समोर येत आहे.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गोळीबारासाठी वापरलेली रायफल जप्त केली आहे. आसाम रायफल्सच्या या जवानाने असं का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र पोलीस याबाबत कुटुंबीयांशी बोलणार आहेत. आत्महत्या केलेल्या जवानाचा मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्दैवी घटनेचा संबंध मणिपूरमध्ये सुरु असलेल्या संघर्षाशी जोडला जावू नये. कारण जखमींपैकी कोणीही मणिपूरचे नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. घटनेची सखोल चौकशी केली जाणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT