beef ban Saam tv
देश विदेश

Assam govt toughens beef ban: हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बीफवर बंदी, आसाम सरकारचा मोठा निर्णय

Assam government toughens beef ban : आसाम सरकारने बीफबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बीफवर बंदी घालण्यात आली आहे.

Saam Tv

आसाममधील हिमंता बिस्वा सरमा सरकारनं गोमांस बंदीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरमा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 'आसाममध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस खरेदी आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे,' असं सरमा यांनी सांगितलं. त्यांनी याबाबतचा एक व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

गोमांसावर बंदी घालण्यामागचे मुख्य कारण त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणतात, 'आसाममध्ये गोहत्या थांबवण्यासाठी आम्ही ३ वर्षांपूर्वी कायदा आणला होता. या कायद्यामुळे आम्हाला गोहत्येच्या विरोधात यश मिळाले. आता हॉटेल, रेस्टॉरंट किंवा सार्वजनिक ठिकाणी बीफ विकले जाणार नाही. यापूर्वी आम्ही आणखीन एक निर्णय घेतला होता. कोणत्याही मंदिराच्या ५ किलोमीटरपर्यंत गोमांस विकले जाणार नाही.'

भाजपाकडून काँग्रेसला आव्हान

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतलेल्या निर्णयाचं भाजप नेते पीजूष हजारिका यांनी स्वागत केलं. त्यांनी ही पोस्ट त्यांच्या एक्स पोस्टवरही शेअर केली. यात त्यांनी काँग्रेसला आव्हान दिलं आहे. 'मी आसामच्या काँग्रेस नेत्यांना आव्हान देतो. बीफ बंदीचे स्वागत करा. अथवा पाकिस्तानात जाऊन स्थायिक व्हा,' असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

काँग्रेसने केलेल्या आरोपांवर भाजपने घेतला निर्णय

आसाममध्ये गोमांस विक्रीच्या मुद्यावर राजकारण जोरात सुरू होतं. काही दिवसांपूर्वी समगुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. हा परिसर मुस्लिमबहुल आहे. त्यात गोमांस वाटल्याचा आरोप भाजपवर करण्यात आला होता.

या वादावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप - प्रत्यारोप होत होते. काँग्रेसच्या आरोपांवर मुख्यमंत्री सरमा यांनी उत्तर दिलं. 'काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी जर पत्र लिहून गोमांसावर बंदी घालण्याची विनंती केली तर, मी संपूर्ण राज्यात गोमांसावर बंदी घालेन. मग काँग्रेस नेत्यांनी सांगावं या आधीच्या निवडणुका त्यांनी गोमांस वाटूनच जिंकल्या होत्या का?, असा सवाल सरमा यांनी काँग्रेसला केला होता. तसेच गोमांसावर बंदी घालण्यात यावी, असे काँग्रेस नेते रकीबुल हुसैन यांनाही आवाहन करतो. गोमांस विक्री चुकीची आहे हे त्यांनी स्वतःही सांगितले; पण हीच बाब त्यांनी लेखी द्यावी, ' असेही सरमा म्हणाले.

Edited by - bhagyashree kamble

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT