Pm Narendra Modi - Xi Jinping Saam Tv
देश विदेश

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत अरुणाचलच्या खेळाडूंना प्रवेश देण्यास चीनचा नकार, भारताने दिलं कडक उत्तर...

Indian Vs China: आशियाई क्रीडा स्पर्धेत अरुणाचलच्या खेळाडूंना प्रवेश देण्यास चीनचा नकार, भारताने दिलं कडक उत्तर...

Satish Kengar

Asian Games 2023:

चीनने आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन भारतीय खेळाडूंना प्रवेश न दिल्यामुळे भारताने कठोर भूमिका घेतली आहे. चीनच्या या कृतीचा निषेध करत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला बीजिंग दौरा रद्द केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते चीनला जाणार होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन चीनमधील हांगझोऊ येथे होत आहे. हे खेळ 23 सप्टेंबरपासून सुरू होणार असून ते 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. अरुणाचल प्रदेशातील वुशू खेळाडूही हँगझोऊमध्ये सहभागी होणार होते, परंतु तीन वुशू खेळाडू न्यामन वांगसू, ओनिलू टेगा आणि मेपुंग लामगु यांना चीनमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.

हे सर्व भारतीय खेळाडू अरुणाचल प्रदेशचे रहिवासी आहेत. त्यापैकी एकाला अ‍ॅक्रिडिशन मिळालं होतं आणि दोघे त्याची वाट पाहत होते. मात्र बुधवारी टीम चीनला रवाना झाली तेव्हा बोर्डिंगसाठी योग्य क्लिअरन्स नसल्याने त्यांना विमानात चढू दिले गेले नाही. (Latest Marathi News)

चीनने काय दिली प्रतिक्रिया?

चीनने शुक्रवारी तीन भारतीय खेळाडूंना प्रवेश नाकारण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. या खेळाडूंकडे वैध कागदपत्रे नव्हती, असे चीनचे म्हणणे आहे. मात्र, हे खेळाडू अरुणाचल प्रदेशचे असल्याने चीनने त्यांना एंट्री देण्यास नकार दिल्याचे मानले जात आहे. कारण अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, चीन आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वैध कागदपत्रांसह सर्व खेळाडूंचे स्वागत करतो. तुम्ही उल्लेख केलेला तथाकथित अरुणाचल प्रदेश चीन ओळखत नाही. दक्षिण तिबेट प्रदेश हा चीनचा भाग आहे. भारताने या घंटेचा निषेध केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT