अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी देश का सोडला? फेसबुक पोस्ट लिहित दिले उत्तर Saam Tv
देश विदेश

अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी देश का सोडला? फेसबुक पोस्ट लिहित दिले उत्तर

घनी यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे देश सोडण्याचे कारण दिले आहे.

वृत्तसंस्था

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान (Afganistan) ताब्यात घेतल्याने त्याचे अध्यक्ष अश्रफ घनी (Ashraf Ghani) यांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडून पळून जावे लागले. आता अश्रफ घनी यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले की त्यांना अफगाणिस्तान का सोडावा लागला. घनी यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे देश सोडण्याचे कारण दिले आहे.

अश्रफ घनी यांनी रविवारी सांगितले की तालिबान्यांनी राजधानी काबुलमध्ये प्रवेश केल्यानंतर रक्तपात टाळण्यासाठी आपण देश सोडला आहे. आपल्या फेसबुक पेजवरील एका पोस्टमध्ये, घनी म्हणाले की, 20 वर्षांच्या युद्धानंतर लाखो काबूल रहिवाशांचे भवितव्य आणि शहराची सुरक्षा धोक्यात आणून त्यांना कठीण निर्णयाचा सामना करावा लागला आहे.

Ashraf Ghani Post

राष्ट्रपती भवन सोडल्यानंतर आणि देश सोडल्यानंतर आपल्या पहिल्या फेसबुक पोस्टमध्ये घनी म्हणाले की, रक्तपात टाळण्यासाठी, मला वाटले की देश सोडणे चांगले. ते म्हणाले की, तालिबानी बंडखोर जे नंतर काबूलमधील राष्ट्रपती भवनात घुसले त्यांना आता ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे.

ते म्हणाले की तालिबान तलवार आणि बंदुकीच्या धाकाने जिंकला. आमच्या देशबांधवांच्या सन्मान, समृद्धी आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची होती. मात्र, अश्रफ घनी यांनी त्यांच्या सध्याच्या स्थानाची माहिती उघड केलेली नाही. अल जझीरा या वृत्तवाहिनीने घनींच्या वैयक्तिक अंगरक्षकाचा हवाला देत म्हटले की, घनी, त्यांची पत्नी, त्यांचे मुख्य कर्मचारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेजारील उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये आहेत.

अशरफ घनी यांच्यावर देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप

त्याचवेळी अफगाण संसदेचे माजी सदस्य जमील करझई यांनी अशरफ घनी यांनी देशाशी विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, देशात जे काही घडले त्याला घनी जबाबदार आहे. लोक त्यांना कधीही माफ करणार नाहीत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT