'स्वातंत्र्याचे विधान जर मुस्लिमाने केले असते तर त्याचा Encounter केला असता' Twitter/ @AIMIM
देश विदेश

'स्वातंत्र्याचे विधान जर मुस्लिमाने केले असते तर त्याचा Encounter केला असता'

AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त विधानावरुन निशाणा साधला आहे.

वृत्तसंस्था

अलिगढ: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत वर तिच्या वादग्रस्त विधानावरुन निशाणा साधला आहे. ते उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे प्रचार सभेला संबोधित करत होते. 1947 मध्ये भारताला जे मिळाले ते 'भीक' होतं आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2014 मध्ये देशाला खरी स्वातंत्र्य मिळाले, असे कंगना म्हणाली होती.

AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ''एक मोहतरमा म्हणाल्या की देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, जर एखाद्या मुस्लिमाने चुकून असे म्हटले असते तर त्याच्यावर UAPA लावला असता. तुरुंगात टाकण्यापूर्वी त्याला पोलीस ठाण्यात नेऊन गुडघ्यावर गोळ्या घातल्या असत्या, तुम्हाला देशद्रोही ठरवले असते. पण, ती राणी आहेस आणि तूम्ही महाराज आहात, म्हणूनच कोणी काही करत नाही, तूम्ही का करत नाही? भारत-पाकिस्तान मॅचमध्ये चुकून कोणी काही लिहिलं, तर बाबा म्हणाले त्याला तुरुंगात पाठवा. गद्दारी चा आरोप लावला आणि त्याला जेलमध्ये पाठवले''.

ते पुढे म्हणाले, 'मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानांना विचारतो की, देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला की 2014 मध्ये… आणि जर हे चुकीचे असेल, तर देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देशद्रोहाचा आरोप लावणार? देशद्रोह फक्त मुस्लिमांसाठी आहे का? यापेक्षाही हे संविधानाच्या विरोधात आहे. पंतप्रधान गप्प का? या वक्तव्यानंतर भाजपाकडून प्रतिक्रिया आली की या विधानावर आमचा विश्वास नाही… विश्वास नाही तर मग आम्ही बोलतो तर मग आमच्यावरच खटला कशाला, तुमच्या बोलण्यावर आमचा विश्वास नाही, हेही सांगा''.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Bath Tips: थंडीत गरम पाण्याने की थंड पाण्याने अंघोळ करणं योग्य आहे?

Shocking: मुंबई हादरली! निवृत्त जवानाकडून १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडिता २ महिन्यांची गरोदर

Samruddhi Mahamarg : धक्कादायक! एकीकडे पाय, दुसरीकडे तोंड; समृद्धी महामार्गा लगत आढळला २ तुकड्यात मृतदेह

Rava Kesari Halwa Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला काय करायचं? बनवा हॉटेल स्टाईल सॉफ्ट टेस्टी रवा केशर हलवा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : फाटकी नोट घेतली नाही, म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर उगारली तलवार

SCROLL FOR NEXT