arvind kejriwal news Saam tv
देश विदेश

Delhi Politics : अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का; पक्षातील १५ शिलेदारांनी साथ सोडली, दिल्लीत 'ठाकरे' पॅटर्न

arvind kejriwal news : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील १५ नगरसेवकांनी साथ सोडली आहे.

Vishal Gangurde

दिल्लीतील सत्ता गमावल्यानंतर आम आदमी पक्षाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. आम आदमी पक्षातील काही शिलेदारांनी दिल्ली महापालिकेत नव्या गटाची घोषणा केली आहे. दिल्ली महापालिकेत आता तिसरी आघाडी पाहायला मिळणार आहे. या आघाडीचे प्रमुख मुकेश गोयल असणार आहेत. मुकेश गोयल यांच्या पक्षाचं नाव इंद्रप्रस्थ विकास पक्ष असणार आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील महापालिकेत मोठा बदल झाला होता. मुकेश गोयल यांनी राज ठाकरे यांच्या सारखी भूमिका घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.

तिसरी आघाडी म्हणजे इंद्रप्रस्थ विकास पक्षाचे अध्यक्ष मुकेश गोयल असणार आहेत. तिसऱ्या आघाडीसाठी राजीनामा देणाऱ्यांमध्ये १५ नगरसेवकांचा समावेश आहे. यात हेमनचंद गोयल, दिनेश भारद्वाज, हिमानी जैन, उषा शर्मा, साहिब कुमार, राखी कुमार, अशोक पांडेय, राजेश कुमार, अनिल मीणा, देवेंद्र कुमार यांच्या नावाचा समावेश आहे. १३ जणांनी मुकेश गोयल यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे. तर दोघांचं अद्याप ठरलेलं नाही.

सर्व नगरसेवकांनी एकच कागदावर सही करत भूमिका स्पष्ट केली आहे. याच कागदावर राजीनाम्याची देखील घोषणा केली आहे. तसेच यात राजीनाम्याचे कारण देखील नमूद केलं आहे. राजीनामा देणारे सर्व नगरसेवक हे दिल्ली महापालिकेच्या २०२२ साली झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून निवडून आले होते. दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाची सत्ता येऊनही पक्षातील अंतर्गत वाद हाताळण्यास अरविंद केजरीवालांना जमलं नाही.

दिल्ली महापालिकेच्या आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये समन्वय नसल्याने पक्षाला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. लोकांना दिलेले आश्वसान पूर्ण न केल्याने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व राजीनामा दिला आहे. या नगरसेवकांनी राजीनामा दिल्याने दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT