Delhi Election 2022: दिल्ली महापालिका निवडणुकीत महिलांना प्राधान्य; एकूण 709 महिला निवडणुकीच्या रिंगणात

Delhi MCD Election 2022: ४ डिसेंबरला मतदान होईल आणि ७ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
Voting
VotingSaamTV
Published On

शिवाजी काळे, नवी दिल्ली

Delhi MCD Election 2022 News: नवी दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. येत्या ४ डिसेंबरला दिल्लीत मतदान होईल आणि ७ डिसेंबरला निकाल जाहीर होईल. दिल्ली महापालिकेच्या २५० वार्डांसाठी मतदान पार पडेल. या निवडणुकांसाठी दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आप या तिन्ही पक्षाकडून महिलांना उमेदवारी देण्यावर प्राधान्य देण्यात आलं आहे. दिल्ली महानगरपालिच्या निवडणुकीत 250 वार्डांपैकी 50 टक्के वार्डांमध्ये महिला उमेदवारांना आरक्षण आहे, त्यामुळे यंदा महिला उमेदवारांना सर्वच प्रमुख पक्षांनी प्राधान्य दिलं आहे.

Voting
Dapoli Crime: बँकेच्या ATMमध्ये पैसे लोडिंग न करता 55 लाख 50 हजार रुपयांची अफरातफर; दोघेजण दापोली पोलिसांच्या ताब्यात

मिळालेल्या माहितीनुसार, आप पक्षाकडून 140 महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपकडून 137 आणि काँग्रेसकडून 134 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्ली (Delhi) महापालिका निवडणुकीच्या (Elections 2022) रिंगणात तब्बल 709 महिला उमेदवार आहेत, तर 640 पुरुष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

४ नोव्हेंबर २०२२ ला दिल्ली निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार ७ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून १४ नोव्हेंबरपर्यंच अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ४ डिसेंबरला मतदान होईल आणि ७ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. (Latest Marathi News)

Voting
Bihar Accident: बिहारमध्ये मोठा अपघात; भरधाव ट्रकनं १५ जणांना चिरडलं, मृतांमध्ये ६ बालकांचाही समावेश

दिल्ली महापालिकेच्या २५० वार्डांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ४२ वार्ड राखीव आहेत. याशिवाय ५० टक्के मतदारसंघ महिलांसाठी राखीव असते. दिल्लीमधील महापालिकेच्या पुनर्रचनेनंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. दिल्लीत १ जानेवारी २०२२ पर्यंत १.४८ कोटी मतदार होते. गृहमंत्रालयानं महापालिकांच्या एकत्रीकरणाबद्दलचं नोटिफिकेशन जारी केल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. यापूर्वी दिल्लीत २७२ वार्ड होते. आता त्याची संख्या २५० झाली आहे. मोदी सरकारनं २०२२ मध्ये दिल्लीच्या तीन महापालिकांचं एकत्रीकरण केलं होतं. त्यानंतर आता पहिल्यांदा दिल्लीत निवडणूका होणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com