Bihar Accident News: बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एक भरधाव ट्रकनं तब्बल १५ जणांना चिरडलं आहे. यात १५ लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. काल, शनिवारी वैशाली जिल्ह्यातील मेहनार गावात हा भीषण अपघात घडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची दखल घेतली असून, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. (Bihar's Vaishali accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, हाजीपूर-महानर (Bihar) मुख्य रस्त्यावरील देसरी पोलीस स्टेशन हद्दीतील नयागाव टोलाजवळ हा अपघात (Accident) झाला. नजीकच्या ब्रह्मस्थान येथे भुईं बाबाची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्याचवेळी भरधाव वेगात असलेल्या अनियंत्रित ट्रकने अनेकांना चिरडले आणि नंतर ट्रक एका झाडावर आदळला. या ट्रकचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता असे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर एकच खळबळ माजली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेले, ज्यामध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये सहा ते आठ वयोगटातील मुलांचाही समावेश आहे. (Latest Marathi News)
या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केलं की, बिहारमधील रस्ते अपघातात लहान मुलांसह अनेक लोकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. आणि जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी प्रार्थना करते.
पीएम मोदींनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की - बिहारमधील वैशाली येथे झालेला अपघात दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. जखमी लवकर बरे होवोत. PMNRF कडून प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येईल.
वैशाली दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट केलं की, देसरी पोलीस स्टेशन परिसरात एका वेगवान ट्रकने लहान मुलांसह अनेकांना चिरडल्याच्या घटनेने दुःख झाले आहे. मृतांच्या नातेवाईकांप्रती तीव्र सहानुभूती असून त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना
दरम्यान, या घटनेनंतर लगेचच डीएम, एसडीएम आणि एसपी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर मध्यारात्री दीडच्या सुमारास सर्व मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी हाजीपूर सदर रुग्णालयात आणण्यात आले. आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर हाजीपूर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.