Terrorists Attacked on Army Truck Saam TV
देश विदेश

Terrorists Attacked on Army Truck: लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला; पाच जवान शहीद

Terrorists Attacked on Army Truck: दहशतवाद्यांनी ग्रेनेडचाही वापर केल्याने वाहनाला आग लागल्याचा अंदाज आहे.

साम टिव्ही ब्युरो

Terrorist Attack on Army Truck: भारतीय लष्कराच्या ट्रकवर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात घटना समोर आली आहे. या हल्ल्यानंतर लष्कराच्या ट्रकला लागलेल्या आगीत भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले आहेत.

या घटनेबाबत भारतीय लष्कराकडून हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात आले आहे. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेत अज्ञात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्र्कवर जोरदार गोळीबार केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमुळे गाडीला आग लागली. (Latest News)

लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३ वाजता राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछ दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेडचाही वापर केल्याने वाहनाला आग लागल्याचा अंदाज आहे. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेत हा दहशतवादी हल्ला झाला.

या भागात दहशतवादविरोधी कारवाईसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. तर आणखी एका जवान गंभीर जखमी असून त्याला तात्काळ राजौरी येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या या जवानावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम लष्कराने सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

SCROLL FOR NEXT