Apple iPhone 14 launch event Latest Update In Marathi saam tv
देश विदेश

Apple iPhone 14 launch event: अॅपलचा 'पिटारा' आज उघडणार; आयफोन 14 कसा असेल ? उत्सुकता शिगेला

अॅपल आयफोन १४ ची किंमत काय असू शकते? याबाबत मोठी उत्सुकता आहे.

Nandkumar Joshi

Apple iPhone 14 launch Event | अॅपल आणि आयफोन चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. आज अॅपल आपल्या नव्या गॅझेट्सची घोषणा करणार आहे. भारतीय वेळेनुसार, अॅपलचा हा इव्हेंट आज, बुधवारी रात्री १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. या इव्हेंटमध्ये अॅपल आयफोन १४ सह इतर अनेक गॅझेट्स लाँच होऊ शकतात. यात अॅपल वॉच, हार्डवेअर अँड अॅक्सेसरीजही असणार आहेत.

अॅपलचा (Apple) हा इव्हेंट अॅपलची इव्हेंट वेबसाइट आणि युट्यूब चॅनलवरही पाहू शकता. याशिवाय यूजर्सना अॅपल टीव्ही आणि अॅपल टीव्ही प्लसच्या स्ट्रीमिंग बॉक्सवरही पाहता येऊ शकतो. हा इव्हेंट पेजवर वरच्या भागात पाहता येऊ शकेल.

अॅपलच्या मुख्यालयात होणार मेगाइव्हेंट

अॅपलचा हा इव्हेंट कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात होणार आहे. Cupertino असे अॅपलच्या मुख्यालयाचे नाव आहे. मागील एक दशकाहून अधिक काळापासून अॅपलचे असे इव्हेंट होत आहेत.

२०१२ मध्येही अॅपलने आयफोन ५ अशाच प्रकारे लाँच केला होता. अॅपल आपले कोणकोणते गॅझेट्स लाँच करू शकते, याबाबत आता उत्सुकता अधिकच वाढली आहे.

या इव्हेंटचे खास आकर्षण हे आयफोन १४ असेल. नव्या आयफोन सीरीजच्या (iPhone) फोनबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. टेक रिपोर्ट्सनुसार, अॅपल आयफोन १४ हा चार नव्या मॉडल्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. प्रत्येक मॉडल वेगळा असेल. प्रत्येकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतील. अॅपल मिनी आयफोन बंद करू शकते, असं बोललं जात आहे. आता आयफोन ६.१ आणि ६.७ इंच डिस्प्ले असणारे मॉडल्स बाजारात आणण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT