APJ Abdul Kalam Death Anniversary inspiring quotes SAAM TV
देश विदेश

APJ Abdul Kalam Death Anniversary: 'मिसाइल मॅन' डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे १० प्रेरणादायी विचार

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज सातवी पुण्यतिथी आहे. त्यांचे विचार आजही युवा पिढीला प्रेरणा देताहेत.

साम टिव्ही ब्युरो

APJ Abdul Kalam Death Anniversary: भारताचे ११ वे राष्ट्रपती आणि 'मिसाइल मॅन' म्हणून ज्यांना ओळखले जाते, अशा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज सातवी पुण्यतिथी आहे. त्यांचे विचार आजही युवा पिढीला प्रेरणा देताहेत.

एक महान विचारवंत, लेखक आणि शास्त्रज्ज्ञ, तसेच भारताचे ११ वे राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr APJ Abdul Kalam) यांची आज सातवी पुण्यतिथी आहे. डॉ. कलाम आज आपल्यात नाहीत. पण त्यांचा आदर्श मार्ग प्रत्येक देशवासियाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी २००२ ते २००७ या कालावधीत देशाचे राष्ट्रपतीपद (President) भूषवले आहे. त्यांनी देशाच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे. डीआरडीओ आणि इस्रो या देशातील महत्वाच्या संस्थांमध्येही त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. त्यांना मिसाइल मॅन म्हणूनही ओळखले जाते.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताला जागतिक महसत्ता बनवण्यासाठी सर्वात महत्वाच्या ठरलेल्या आण्विक चाचण्यांपैकी एक असलेल्या पोखरण - II मध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. यासह त्यांनी देशाला संरक्षण क्षेत्रात पुढे नेतानाच, भारतीय बॅलेस्टिक मिसाइल आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञान विकसित केले. 'विंग्ज ऑफ फायर' हे त्यांनी लिहिलेले पुस्तक आजही युवा पिढीला 'उड्डाण' भरण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

डॉ. कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरममध्ये झाला होता. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे काही प्रेरणादायी विचार जाणून घेऊयात.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे १० प्रेरणादायी विचार

१) ख़्वाब वह नहीं होते जो हम सोते में देखते हैं, बल्कि ख़्वाब वह होते हैं जो हमें सोने ही न दें.

२) हमें जीवन में कभी किसी से हार नहीं माननी चाहिए और समस्या को हमें हराने की अनुमति नहीं देनी चाहिए.

३) इस दुनिया में किसी को हराना बहुत ही आसान है, लेकिन किसी को जीतना उतना ही मुश्किल है.

४) पहली बार जीत मिलने पर हमें आराम नहीं करना चाहिए. अगर दूसरी बार हार गए तो लोग बोलेंगे कि हमें मिली पहली जीत केवल एक तुक्का थी.

५) अगर तुम सूरज की तरह चमकना चाहते हो, तो सबसे पहले सूरज की तरह जलो.

६) विज्ञान मानवता के लिए एक खूबसूरत तोहफा है, हमें इसे बिगाड़ना नहीं चाहिए.

७) जानें कि आप कहां जा रहे हैं.दुनिया में सबसे बड़ी बात यह नहीं जानना है कि हम कहां खड़े हैं, हम किस दिशा में आगे बढ़ रहे हैं.

८) जब आपकी आशाएं और सपने और लक्ष्य धराशायी हो जाते हैं, तो मलबे के बीच खोज करें, आपको खंडहर में छिपा एक सुनहरा अवसर मिल सकता है.

९) देश का सबसे अच्छा दिमाग कक्षा की आखिरी बेंच पर पाया जा सकता है.

१०) यदि आप समय की रेत पर अपने पैरों के निशान छोड़ना चाहते हैं, तो अपने पैरों को मत खींचो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT