Sakshi Sunil Jadhav
उच्च शिक्षणाशी निगडित काही मानस असेल तर आज त्या गोष्टी घडतील. घरातील वातावरण आनंदी आणि सुखकारक राहील. आईची विशेष काळजी घ्यावी.
शेजारी सहकार्य मिळेल. भावंड सौख्यच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. एखादी नवीन जबाबदारी अंगावर येऊन पडेल.
जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आज कुठेही साक्षीदार राहू नका. मनातील मनोकामना धनाशी निगडित असतील तर आज पूर्ण होतील.
आपला प्रभाव इतरांवर राहील. वात्सल्य आणि प्रेमाने समोरच्या व्यक्तीमत्वाला आपण भारावून टाकाल. काहीतरी जगण्याची नवीन उमेद आज तुम्हाला लाभेल.
अडचणीतून वाट काढत पुढे जावे लागेल. हॉस्पिटलाझेशन, बंधन योग याचे योग आहेत. विनाकारण कोणत्यातरी गोष्टीचा व्यय होईल.
बौद्धिक क्षेत्रात प्रगतीचे योग आहेत. वक्तृत्वामधून लाभ होतील. परदेशी वार्तालाप होतील. दिवस चांगला आहे.
कर्माचा लेखाजोखा आज अनुभवाल. न्यायकारक गोष्टी तुमच्या बाबतीत घडतील. समाजकारण, राजकारणामध्ये विशेष प्रगती राहील. दिवस चांगला आहे.
लांबच्या प्रवासाच्या दृष्टीने आजचा दिवस आलेला दिसतो आहे. आपल्याला वेगळी ताकत आणि उमेद घेऊन पुढे जाल. भाग्यकारक घटना घडतील.
दोलायमान मानोवस्था राहील. निर्णय घेताना थोडे अडचणीचे ठरेल. काट्यांची वाट आज भेदावी लागेल. दुपारनंतर महत्त्वाची कामे करावीत.
आयुष्यामध्ये कष्ट आणि मेहनत जास्त आहे. हे आज तुम्हाला जाणवेल. व्यवसायामध्ये जुन्या काही गोष्टींमधूनच प्रगती साधणार आहात. जोडीदाराची साथ मिळेल.
आज आपली सोशिकता वाढवावी लागेल. आपल्या जवळच्या लोकांकडून त्रास संभवतो आहे. थोडासा दिलासा म्हणजे नोकरीच्या ठिकाणी योग्य ती दिशा आज आपल्याला सापडेल.
कोणतेही सोपस्कार न करता सहज सुलभ असा आजचा दिवस आहे. धर्माविषयी जागृती आपणास निर्माण होईल. दत्तगुरूंची कृपा राहील. दिवस उत्तम आहे.