देश विदेश

Rahul Gandhi vs Anurag Thakur: अनुराग ठाकूर यांनी शिवी दिली, मला त्यांची माफीही नको; संसदेत राहुल गांधी आणि भाजप नेत्यांमध्ये घमासान Video

Rahul Gandhi: काँग्रेस खासदार आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अनुराग ठाकूर जात जनगणनेच्या मुद्द्यावरून एकमेकांना भिडले. यावेळी राहुल गांधी यांनी अनुराग ठाकूर यांनी मला शिवीगाळ आणि अपमान केल्याचा आरोप केला.

Bharat Jadhav

संसदेमधील लोकसभेच्या सभागृहात राहुल गांधी आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपलीय. जात जनगणनेच्या मुद्द्यावरुन विरोधीपक्ष नेते राहुल गाधी आणि भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्या तू-तू मैं-मैं झाली. या दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि यादरम्यान अखिलेश यादव यांनीही राहुल गांधींना पाठिंबा देत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना घेरले. या काळात सभागृहात मोठा गोंधळ उडाला.

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होतेय. सभागृहात चर्चेदरम्यान अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस पक्षातील आजी-माजी पंतप्रधानांचा उल्लेख केला. प्रत्येक काळात झालेल्या घोटाळ्यांचा उल्लेख केला. काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या काळात हलवा कोणाला मिळाला? काही लोक ओबीसींबद्दल बोलतात. त्यांच्यासाठी ओबीसी म्हणजे ओन्ली फॉर ब्रदर इन लॉ कमिशन. मी म्हटलं होतं की ज्यांना जात कळत नाही ते जन गणनेवर बोलत आहेत. मी कोणाचेही नाव घेतले नाही, पण उत्तर द्यायला कोण उभे राहिले?

त्याआधी लोकसभेत बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, असत्याला पाय नसतात आणि ते काँग्रेस पक्षाच्या खांद्यावर स्वार होते असं म्हटलं होतं. ज्या प्रकारे मदारीच्या खांद्यावर माकड असते. राहुल गांधी यांच्या खांद्यावर खोट्या गोष्टींचा पोशाख आहे. राहुल गांधींवर निशाणा साधत अनुराग ठाकूर म्हणाले, 'त्यांना हे माहित असले पाहिजे की एलओपीचा पूर्ण प्रकार विरोधी नेता आहे, प्रचाराचा नेता नाही. काँग्रेस पक्षाने मोठा भ्रष्टाचार केला आहे.

या टिप्पण्यांनंतर सभागृहात गोंधळ वाढला, त्यामुळे सभापतींनी राहुल गांधींना अनुराग ठाकूर यांना उत्तर देण्याची परवानगी दिली. त्यानंतर राहुल गांधी उभे राहिले आणि 'अनुराग ठाकूर' यांनी मला शिवीगाळ करून अपमान केल्याचा आरोप केला. पण मला त्यांच्याकडून माफी नकोय. त्यावेळी सभापतींच्या खुर्चीवर जगदंबिका पाल सभागृहात सभापतींच्या खुर्चीवर बसल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: पंड्या RCB कडून खेळणार! लागली तब्बल इतक्या कोटींची बोली

Viral Video: जयगड बंदरावर माशांचा आला थवा, पाहा VIDEO

Narendra Modi : 'पराभूत होणाऱ्यांना संसदेत...'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी PM मोदी विरोधकांवर कडाडले

Top 10 MLA: सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले टॉप १० आमदार कोण?

Dheeraj Deshmukh News : .. अन् धीरज देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना झाले अश्रु अनावर|VIDEO

SCROLL FOR NEXT