American Airlines Pee-gate Case Saam Tv
देश विदेश

Pee-gate Case: धक्कादायक! न्यूयॉर्कहून भारतात येणाऱ्या विमानात मद्यधुंद व्यक्तीने सहप्रवाशावर केली लघुशंका

American Airlines : न्यूयॉर्कहून भारतात येणाऱ्या विमानात मद्यधुंद व्यक्तीने सहप्रवाशावर केली लघुशंका

Satish Kengar

American Airlines Pee-gate Case: विमानांमध्ये सहप्रवाशांवर लघुशंका केल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाने न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एका भारतीय नागरिकाला त्याच्या सहप्रवाशावर लघुशंका केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी सोमवारी दिली.

एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी भारतीय प्रवाशी हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने ही घाट घडली आहे. त्याच्याच काही कारणामुळे वाद झाल्याने त्याने सहप्रवाशावर लघुशंका केली, असं सांगितलं जात आहे.

अमेरिकन एअरलाइन्सच्या AA 292 या विमानात ही घटना घडली. विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर उतरल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी रविवारी रात्री 9 च्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

विमान कंपनीने लँडिंगपूर्वी दिल्ली विमानतळाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने कारवाई करत दोन्ही प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सीआयएसएफने दोघांनाही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. सूत्रांनी सांगितले की, पीडित प्रवाशाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, विमानात प्रवास करताना मद्य प्राशन केल्यानंतर काही प्रवाशांनी सहप्रवाशांवर लघुशंका केल्याच्या घटना अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत.

गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानात अशीच एक घटना समोर आली होती. त्यावेळी न्यूयॉर्क-दिल्ली विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पालघरमध्ये भूकंपाच्या पार्श्वभूमीवर NDRFचे जनजागृती प्रशिक्षण

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

SCROLL FOR NEXT