Breaking: राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण ! भारतात आतापर्यंत 33 जणांना लागण SaamTV
देश विदेश

Breaking: राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण ! भारतात आतापर्यंत 33 जणांना लागण

व्यक्ती झिम्बाब्वे येथून परतली होती.

वृत्तसंस्था

दिल्ली : Omicron Variant चे दुसरे प्रकरण दिल्लीत नोंदवले गेले आहे. दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले होते आणि ती झिम्बाब्वे येथून आली होती. ती व्यक्ती दक्षिण आफ्रिकेलाही गेली होती अशी माहिती दिल्ली सरकारने दिली आहे.

कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनचे दुसरे प्रकरण दिल्लीत समोर आले आहे. झिम्बाब्वे येथून परतलेलय प्रवाशाचा जीनोम सिक्वेन्सिंग (Genome sequencing) अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीमध्ये दक्षिण आफ्रिकेचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. यासह, भारतात आतापर्यंत 33 लोकांना कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झाली आहे.

दिल्लीत परदेशातून आलेल्या लोकांपैकी २७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. आतापर्यंत 25 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर दोन जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत.

भारतात ओमिक्रॉनची 33 प्रकरणे

भारतात आतापर्यंत Omicron चे 33 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 17, राजस्थानमध्ये 9, गुजरातमध्ये 3, दिल्लीत 2 आणि कर्नाटकात 2 रुग्ण आढळले आहेत. तर, राजस्थानमधील सर्व 9 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही दिलासादायक बाब आहे. पुण्यातील रुग्णाचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. तर दुसरीकडे, कर्नाटकातील एक ओमिक्रॉनचा रुग्ण दुबईला पळून गेला आहे.

काल देशात 9 प्रकरणे सापडले

शुक्रवारी देशात ओमिक्रॉनची 9 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 7 आणि गुजरातमधील जामनगरमध्ये 2 प्रकरणे आढळून आली. महाराष्ट्रात आढळलेल्या प्रकरणांपैकी तीन प्रकरणे मुंबईत तर चार प्रकरणे पिंपरी चिंचवड महापालिकेत आढळून आली आहेत. मुंबईत सापडलेल्या बाधित रुग्णांचे वय 48, 25 आणि 37 वर्षे आहे. हे तिन्ही नागरिक टांझानिया, यूके आणि दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत.

मुंबईतील ओमिक्रॉन प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. 11-12 डिसेंबरसाठी येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे. याशिवाय रॅली, मिरवणूक आणि मोर्चांनाही बंदी घालण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : शेवटच्या विकेटआधी वाद! मोहम्मद सिराज कॅप्टन गिलवर संतापला, नेमकं काय घडलं? Video

कबुतरखाने बंदीवरुन नवाच वाद पेटला; आरोग्य की श्रद्धा?

Modi Shah Meets President: कुछ तो बडा होने वाला है! 5 ऑगस्टला कुठला मोठा निर्णय होणार?

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी; नव्या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला तडा जाणार?

Glass Breaking: अचानक काच फुटणे 'हे' कोणत्या गोष्टीचे संकेत आहे?

SCROLL FOR NEXT