समीर वानखेडेंची आणखी एक कारवाई; गोव्यात ड्रग्ज तस्करी प्रकरणी दोन महिलांना अटक Saam Tv
देश विदेश

समीर वानखेडेंची आणखी एक कारवाई; गोव्यात ड्रग्ज तस्करी प्रकरणी दोन महिलांना अटक

वृत्तसंस्था

मुंबई : कार्डेलिया क्रूझवर धाड टाकून या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्यानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले. त्यानंतर समीर वानखेडे आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांचे आरोप प्रत्यारोपची मालिका सुरु झाली. यावेळी समीर वानखेडे नवाब मलिकांमुळे नाही, तर त्यांच्या एका कामगिरीमुळे पुन्हा चर्चेत आले आहे.

समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने आणखी एक कारवाई केली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhed) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोव्यात (Goa) ड्रग्ज रॅकेटचा (Drugs Racket) पर्दाफाश केला आहे. एनसीबीने जारी केलेल्या निवेदनानुसार, गोव्यातील सिओलीम येथून दोन महिला ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध प्रकारचे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.

एका गुप्त माहितीवर या कारवाईमध्ये, मुंबई आणि गोवा झोनच्या एनसीबी पथकांनी घटनास्थळावरून 1.30 किलो गांजा आणि 49 टॅबलेट, 25 ग्रॅम अॅम्फेटामाइन, 2.2 ग्रॅम कोकेन, 1 ग्रॅम एमडीएमए पावडर आणि एक वाहन जप्त केले आहे. याबद्दल प्राथमिक तपासानुसार, एक महिला एमडीएमए आणि इतर औषधे पुरवत होती. ती ड्रग सिंडिकेट चालवणाऱ्या एका नायजेरियन महिलेसाठी काम करत होती, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

हे देखील पहा-

निवेदनात म्हण्टले आहे की, “गोव्यातील ड्रग सिंडिकेट चालवल्याचा आरोप असलेल्या दुसर्‍या नायजेरियन महिलेच्या वतीने गोव्यातील एक महिला एमडीएमए आणि ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. उत्तर गोव्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला ग्राहकांना विविध औषधांचा पुरवठा करण्यासाठी हे सिंडिकेट सक्रिय होते. सिंडिकेटमध्ये आणखी काही सदस्य आहेत. परदेशी नागरिकांचाही समावेश आहे, त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच स्थानिक न्यायालयाने आरोपी महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे,”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT