ANGRY ANDERSON DIES AT 79 saam tv
देश विदेश

संगीत विश्वावर शोककळा! प्रसिद्ध गायकाचं निधन; सर्व कार्यक्रम रद्द

Angry Anderson Dies At 79 Rose Tattoo Singer: ऑस्ट्रेलियन रॉक बँड Rose Tattoo चे प्रसिद्ध गायक, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते अँग्री अँडरसन यांचे 79 व्या वर्षी निधन झाले.

Omkar Sonawane

ऑस्ट्रेलियन रॉक बँड Rose Tatto चे प्रसिद्ध गायक, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते अँग्री अँडरसन यांच निधन झालं आहे. ते 79 वर्षांचे होते. कुटुंबीय आणि बँडमधील सहकाऱ्यांनी त्यांच्या निधनाची महिती दिली. ऑस्ट्रेलियात आपल्या जवळच्या व्यक्तींची उपस्थितीत त्यांचे निधन झाले.

अँडरसन गेल्या पाच दशकांपासून संगीत क्षेत्रात सक्रिय होते. Rose Tattoo सोबत त्यांनी ‘Bad Boy for Love’, ‘Rock 'n' Roll Outlaw’ आणि ‘We Can't Be Beaten’ यांसारखी गाणी लोकप्रिय केली. Suddenly’ या गाण्यामुळे त्यांना एकल गायक म्हणूनही मोठं यश मिळालं. या गाण्याने ऑस्ट्रेलियासह ब्रिटन, आयर्लंड, बेल्जियम आणि नेदरलँडसच्या संगीत चार्टमध्ये स्थान मिळवलं होतं.

अँडरसन यांना ऑगस्टमध्ये युरोप दौऱ्यावर असताना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना जर्मनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल होत. त्यांच्या प्रकृतीमुळे Rose Tatto चा 9 ऑगस्टचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर बँडने युरोप दौऱ्याचा उर्वरित भागही रद्द केला होता. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात दौरा पुन्हा सुरू करण्याचं नियोजन होतं.

संगीताव्यतिरिक्त अँडरसन यांनी दूरदर्शन आणि चित्रपटांमध्येही काम केलं. ते सामाजिक कार्य, धर्मादाय उपक्रम आणि युवा मार्गदर्शनासाठीही ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. Skid Row चे गायक सेबॅस्टियन बाख यांनीही अँडरसन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

अँग्री अँडरसन यांचा जन्म 5 ऑगस्ट 1947 रोजी मेलबर्न येथे झाला होता. त्यांचं बालपण कोबर्ग या कामगारवर्गीय परिसरात गेलं. त्यांची आई मॉरिशसहून ऑस्ट्रेलियात आली होती. 2009 मध्ये ABCच्या ‘Talking Heads’ कार्यक्रमात बालपणीच्या आठवणी सांगताना अँडरसन यांनी आपल्या आईशी संबंधित एक भावनिक प्रसंग सांगितला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, भाजपचे बंडखोर प्रा. अनिल सोले यांची अखेर माघार

नायट्रोजन बॉम्बसारखी पसरली आग! मुंबईत १४ मजली इमारतीचा थरार; २ महिलांचा होरपळून मृत्यू, ४० जणांना वाचवले

Boat Accident: सरकारी नाव उलटून १३ चिमुकल्यांचा करुण अंत, पीएम मोदींकडून दुःख व्यक्त; ६ लाखांच्या मदतीची घोषणा

Wednesday Horoscope : मोठी संधी मिळेल; 5 राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT