Crime News
Crime News saam tv
देश विदेश

Andhra Pradesh News : वर्षभरापासून बंद हाेते घर, दार उघडताच घरमालकाच्या पायाखालची जमीनच सरकली

Shivani Tichkule

Andra Pradesh Crime News : आफताब अमीन पूनावालने आपली लिव्ह इन पार्टनर श्रद्धाची हत्या करून तिचे 35 तुकडे केले. या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापट्टणममध्ये येथे घडली आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका बंद असेल्या घरात ठेवलेल्या ड्रममध्ये महिलेच्या शरीराचे अनेक तुकडे सापडले. वर्षभराहून अधिक काळ हा मृतदेह तेथे पडून असल्याचा पोलिसांना संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भाडेकरूने भाडे घरचे भाडे न देत असल्याने घर मालकाने घराचा दरवाजा तोडला. तेव्हा घरातील एका ड्रममध्ये महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे आढळून आले.

विशाखापट्टणमच्या मदुरवदामध्ये हा प्रकार उघडकीस आला. भाडेकरू काही महिन्यांपूर्वीच घर सोडून गेला. घरमालकाच्या म्हणण्यानुसार, जून 2021 मध्ये भाडेकरू पत्नीच्या गर्भधारणेचे कारण देत घराला कुलूप लावून कुठेतरी गेला होता.

घर सोडल्यानंतरही भाडेकरू एकदा मागच्या दरवाज्यानं घरात शिरला होता. मात्र त्यानं घरमालकाला भाडं दिलेलं नाही. एक वर्ष वाट पाहिल्यानंतर मालकाने भाडेकरूचे सामान काढण्यासाठी जबरदस्तीने घरात प्रवेश केला होता, परंतु घरात जे दृश्य उलगडेल ते त्याला आश्चर्यचकित करणारे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक नांदुरी रमेश यांनी 2019 मध्ये ऋषी नावाच्या व्यक्तीला त्यांचे घर भाड्याने दिले होते. घरात ऋषी आणि त्याची पत्नी राहत असत. ऋषीची पत्नी २०२० मध्ये तिच्या माहेरी गेली होती. पण ऋषीने मे २०२१ मध्ये पत्नीला परत आणले.

पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात एक वर्षापूर्वी मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचे समजते. घरमालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: बारामतीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

Weight Loss Mistakes : एक्सरसाइज अन् व्यायाम करूनही वजन काही कमी होईना? मग जाणून घ्या जाड होण्यामागचं कारण

Sangli Loksabha News: सांगलीचा 'भावी खासदार' कोण? बुलेट, युनिकॉर्नची पैज आली अंगलट; दोघांवर गुन्हा दाखल

ATM Crime : चोरट्यांनी एटीएम मशीनच लांबविली; चोरट्यांनी अगोदर फोडला सीसीटीव्ही

Health Tips: मसाल्यामधील धणे जीरे खाण्याचे आश्चर्यचकित करणारे फायदे

SCROLL FOR NEXT