Gokul Milk Rate : गोकुळचे दूध पुन्हा महागले, आजपासून किती पैसे जास्त द्यावे लागणार? चेक करा नवे दर

पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीनंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ करण्यात आली आहे.
Milk price hiked | Milk Rate Updates
Milk price hiked | Milk Rate UpdatesSaam Tv

Gokul Milk Price Hike : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीनंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाने गायीच्या दुधाच्या दरात प्रतिलीटर 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईची आणखी झळ सोसावी लागणार आहे. (Latest Marathi News)

Milk price hiked | Milk Rate Updates
Chandrapur News : न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने घेतला गळफास; धक्कादायक घटनेनं खळबळ

गोकुळकडून ही दुधाची दरवाढ (Milk Price) मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात करण्यात आली आहे. आजपासून नवे दर लागू होणार असल्याची माहिती गोकुळ दूध वितरण संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली. विशेष बाब म्हणजे गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात मागच्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा वाढ केली आहे.

गोकुळने गायीच्या दूधामध्ये लिटरमागे प्रतिलीटर 3 रुपयांची तर अर्धा लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या दरवाढीमुळे गोकुळच्या गाईच्या दूध दरात प्रतिलिटर 54 रुपये झाला आहे.

Milk price hiked | Milk Rate Updates
Viral News : मुलीचं लग्न अवघ्या १० दिवसांवर अन् आईने ठोकली प्रियकरासोबत धूम, दागिनेही केले लंपास

दुधाचे दर आणखी वाढणार?

देशात जानेवारी ते मार्च दरम्यान दुधाचे दर आणखी वाढणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. जानेवारी ते मार्चमध्ये देशात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते, असं मत इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केले. याचे मुख्य कारण म्हणजे जनावरांचा लम्पी आजार. या रोगामुळे पशुधन कमी झालं आहे. त्यामुळे दूध उत्पादन कमी झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com