आंध्र प्रदेशात मोठा रेल्वे अपघात घडला आहे. येथे विजियानगरममध्ये रविवारी दोन गाड्यांमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनमध्ये ही टक्कर झाली. बचावकार्य सुरू असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितले. याशिवाय एनडीआरएफच्या पथकांचीही मदत घेण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एएनआय या वृत्तसंस्थेने अपघाताची काही फोटो ट्विटवर शेअर केले हेत. घटनास्थळी अनेक लोक उपस्थित असून काही डबे रुळावरून घसरल्याचे दिसून येते. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना नेण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. (Latest Marathi News)
पंतप्रधानांनी घेतला परिस्थितीचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. पीएमओने सांगितले की, अधिकारी जखमींना लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहेत. पंतप्रधानांनी या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
दरम्यान, अपघातस्थळी अंधार असल्याने मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद घटनास्थळी पोहोचले आहेत. ते म्हणाले की, बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि अपघात निवारण गाड्या दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफची टीमही अपघातस्थळी रवाना झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.