Andhra Pradesh Crime News Saam Tv
देश विदेश

१५ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत महिला गेली पळून अन् पुढे तर ....

पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

साम वृत्तसंथा

विजयवाडा: आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, तिथे एका ३० वर्षीय महिलेवर १५ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. ही महिला मुलासोबत राहून शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने पळून गेली होती. पोलिसांनी (Police) हैदराबादमधून एका घरातून त्या मुलाला आणि महिलेला ताब्यात घेतले. १९ जुलै रोजी आठवीत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय मुलाने त्याच्या पालकांना मित्रांना भेटायला जात असल्याचे सांगून गेला होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. मुलगा घरी न आल्यानंतर त्याच्या पालकांनी तक्रार दिली.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, तो अल्पवयीन घरी परतला नाही म्हणून कुटुंबीयांनी आजूबाजूच्या लोकांजवळ चौकशी केली. यानंतर त्यांच्या शेजारी राहणारी एक महिला देखील बेपत्ता असल्याचे समजले. महिलेनेच मुलाचे अपहरण केल्याचा संशय मुलाच्या कुटुंबीयांना आल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले. यानंतर महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, मंगळवारी पोलिसांना माहिती मिळाली की, ही महिला एका अल्पवयीन मुलासोबत हैदराबाद येथील एका खोलीत भाड्याने राहत आहे.

यानंतर पोलिसांनी (Police) घटनास्थळ गाठून दोघांना ताब्यात घेतले. ही महिला त्या मुलाकडे आकर्षित झाली होती, आणि अपहरण करण्यापूर्वीच ती तिच्या घरी त्या मुलाशी शारीरिक संबंध ठेवत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt Scrub : मीठाचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

Railway : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पहिला आरक्षण चार्ट प्रसिद्ध केला जाणार

Maharashtra Live News Update : अलिबाग येथे नव्याने उभारण्यात आलेल्या PNP नाट्यगृहाचे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण

MS Dhoni: कॅप्टन कूल धोनी क्रिकेटशिवाय 'या' कामांमधून कमवतो कोट्यवधी रुपये

पुणे हादरलं! पोलीस कर्मचाऱ्यानं घरात गळफास घेत आयुष्य संपवलं; तपासात पोलिसांना सापडली महत्वाची गोष्ट | Pune Police

SCROLL FOR NEXT