Andhra Pradesh Crime Latest Crime News  Saam tv
देश विदेश

Andhra Pradesh Crime: पत्नीसह २ मुलींची गोळ्या घालून हत्या; मग स्वतःही संपवले आयुष्य, पोलीस कर्मचाऱ्याच्या कृत्याने खळबळ

Crime News Update: थोरली मुलगीही 20 वर्षांची असून ती पदवीच्या पहिल्या वर्षात होती, तर धाकटी मुलगी 10 व्या वर्गात होती.

Gangappa Pujari

Andhra Pradesh Crime:

आंध्रप्रदेशच्या कडप्पामधून एक हादरवुन टाकणारी घटना समोर आली आहे. एक पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी आणि मुलीची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर स्वतःही आयुष्य संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंध्र प्रदेश पोलीस दलातील 1993 च्या बॅचच्या 55 वर्षीय हेड कॉन्स्टेबलने पत्नी आणि दोन मुलींची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेत आयुष्य संपवले. कडप्पा येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी (५ ऑक्टोबर) याबाबतची माहिती दिली आहे. ही घटना वैयक्तिक कारणातून घडली असून गुरुवारी सकाळी ही बाब उघडकीस आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या हेड कॉन्स्टेबलच्या घरातून सुसाईड नोटही सापडली आहे.

व्यंकटेश्वरलू असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो कडप्पा टू टाऊन पोलिस स्टेशनमध्ये काम करत होता. नेहमीप्रमाणे त्याने बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत काम केले आणि पोलिस स्टेशनमधून काही गोळ्या त्याच्या घरी नेल्या होत्या. मृतांपैकी थोरली मुलगीही 20 वर्षांची असून ती पदवीच्या पहिल्या वर्षात होती, तर धाकटी मुलगी 10 व्या वर्गात होती.

सुत्रांच्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबलने शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गमावले होते आणि काही कौटुंबिक समस्यांचाही सामना करत होता. त्यामुळेच हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT