Andhra Pradesh Mothers Revenge Sons Killer Saam TV
देश विदेश

Shocking News: मुलाच्या मारेकऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात खेचलं; रात्री भेटायला घरी बोलावलं अन्... आईने घेतला भयानक बदला

Mothers Revenge Sons Killer: एका महिलेने मुलाच्या खूनाचा असा काही घेतला की, तिचे कृत्य पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

Satish Daud

Andhra Pradesh Mothers Revenge Sons Killer: गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रत्येक गुन्ह्यांमागे कुठलं ना कुठलं भयानक कारण समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आंध्रप्रदेशातून (Andhra Pradesh) समोर आली आहे. येथील एका महिलेने मुलाच्या खूनाचा असा काही घेतला की, तिचे कृत्य पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत.

दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेचं बाजी नामक युवकासोबत सूत जुळलं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी प्रेमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पण महिलेच्या मुलांना या प्रेमाची कुणकुण लागली. त्यांनी या युवकाला माझ्या आईला भेटू नकोस अशी तंबी दिली.

यावर महिलेचा प्रियकर बाजी हा चांगलाच संतापला. त्याने ऑगस्ट २०२१ मध्ये आपल्या मित्राच्या मदतीने महिलेच्या १७ वर्षीय मोठ्या मुलाची हत्या केली. हत्येनंतर दोघांनीही पोलिसांत आत्मसमर्पण केलं. काही महिने तुरुंगात राहिल्यानंतर ते जामिनावर बाहेर आले.

इकडे आपल्या मुलाची हत्या (Crime News) करणाऱ्या आरोपीला ठार करण्यासाठी महिलेने योजना आखली. सुडाने पेटलेल्या महिलेने जामीनावर बाहेर आलेल्या बाजीच्या मित्राची हत्या केली. या हत्येची कबुली तिने पोलिसांना स्वत:हून दिली. याप्रकरणात महिलेला तुरूंगवासाची शिक्षा झाली.

काही दिवस तुरुंगात काढल्यानंतर ती जामीनावर बाहेर आली. बाहेर येताच तिने बाजीला फोन केला. माझे तुझ्यावर आजही तेवढेच प्रेम आहे, मला तुला भेटायचे आहे, असं म्हणत तिने आरोपी बाजीचा पुन्हा विश्वास संपादन केला.

एकेदिवशी घरात लहान मुलगा नसताना महिलेने बाजीला भेटण्यासाठी घरी बोलावले. दोघांनी सोबत मद्यपान केलं. त्यानंतर आपल्या भावाच्या मदतीने तिने बाजीची हत्या केली. हत्येनंतर तिने बाजीचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

तसेच अर्धा जळालेला मृतदेह तिने खड्डा खोदून पुरून टाकला. मुलाच्या दोन्ही मारेकऱ्यांना ठार केल्यानंतर या महिलेने पुन्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. महिलेने घेतलेल्या या सूडाची आंध्रप्रदेशात चांगलीच चर्चा रंगली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT