Anant Ambani Speech Saam TV
देश विदेश

Anant Ambani Speech : अनंत अंबानी यांचं भावनिक भाषण, मुकेश अंबानी यांना अश्रू अनावर, पाहा VIDEO

Mukesh Ambani Emotional : अनंत अंबानी यांनी आपल्या आजाराविषयीही सांगितले, जे ऐकून उपस्थित सर्वजण भावूक झाले. आपल्या लाडक्या मुलाचे भाषण ऐकून मुकेश अंबानी यांनाही अश्रू अनावर झाले.

प्रविण वाकचौरे

Anant Ambani Speech :

मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगजी सध्या जगभर चर्चा आहे. या सोहळ्यात देश-विदेशातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात अनंत अंबानी यांनी केलेल्या भाषणानंतर मुकेश अंबानी भावुक झाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अनंत अंबानी यांनी आपल्या आजाराविषयीही सांगितले, जे ऐकून उपस्थित सर्वजण भावूक झाले. आपल्या लाडक्या मुलाचे भाषण ऐकून मुकेश अंबानी यांनाही अश्रू अनावर झाले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले अनंत अंबानी?

अनंत अंबानी यांनी आपल्या भाषणात आई नीता अंबानी यांचे आभार मानले. वंतारा या त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर विश्वास ठेवल्याबद्दलही आभार मानले.

आईने प्रत्येक गोष्टीसाठी कशी मेहनत घेतली याचा उल्लेख त्यांना आपल्या भाषणात केला. आपल्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमासाठी आई गेल्या चार महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करत आहे. (Latest Marathi News)

मला लहानपणापासूनच आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पण माझ्या आई आणि वडिलांनी मला कधीच याची जाणीव होऊ दिली नाही. प्रत्येक प्रसंगात ते माझ्यासोबत राहिले. मी ठरवलं तर ते करू शकतो याची जाणीव त्यांनी मला नेहमी करून दिली. यावेळी मुकेश अंबानी यांना अश्रू अनावर झाले.

यादरम्यान अनंत अंबानी यांनी राधिका मर्चंटबद्दलही आपल्या भावना व्यक्त केल्या. राधिकासारखी मुलगी त्याच्या आयुष्यात आली हे माझं भाग्य आहे. आपल्या भाषणादरम्यान अनंत अंबानी यांनी भाऊ आकाश अंबानी, वहिनी श्लोका मेहता, बहीण ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्यासह आजी, कोकिलाबेन अंबानी आणि राधिकाच्या पालकांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karela Chutney Recipe : कडू कारल्याची चटपटीत चटणी, साध्या जेवणाची वाढेल रंगत

HBD Salman Khan : आखा बॉलिवूड एक तरफ और सलमान खान एक तरफ; भाईजानची जंगी बर्थडे पार्टी, सेलिब्रिटी ते क्रिकेटपटू सर्वांनी लावली हजेरी

BMC Election : राज-उद्धव यांच्या ऐकीने भाजप-शिंदेंची धडधड वाढली; ६७ वॉर्डांत निकाल फिरणार?

Maharashtra Live News Update: राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' महिलांना मिळणार नाहीत ₹४५००

SCROLL FOR NEXT