7 New Amrit Bharat Express Trains Approved | Indian Railways Saam Tv
देश विदेश

Amrut Bharat Express : रेल्वेचा मोठा निर्णय! देशात धावणार नव्या ७ अमृत भारत एक्स्प्रेस, मुंबईसह 'या' स्थानकांवर थांबणार

New 7 Amrut Bharat Express Update News : स्वातंत्र्यदिनापूर्वी रेल्वेने ७ नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी दिली आहे. धनबाद-कोयंबटूर, प्रयागराज-मुंबई, गोरखपूर-बांद्रा यांसह विविध मार्गांवर प्रवाशांना स्वस्त आणि सोयीचा लांब पल्ल्याचा प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • स्वातंत्र्यदिनापूर्वी रेल्वेची मोठी घोषणा

  • रेल्वे बोर्डाने 7 नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी दिली

  • सर्व गाड्यांमध्ये नॉन-एसी डबे

  • कमी तिकीट दरात लांब पल्ल्याचा प्रवास उपलब्ध

स्वातंत्र्यदिनापूर्वी रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे. रेल्वे बोर्डाने देशातील विविध महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या 7 नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी दिली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसह मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र तसेच दक्षिण भारतातील अनेक शहरांना या गाड्यांचा फायदा होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या तिकीट दरात लांब पल्ल्याचा प्रवास करता यावा, हा या सेवांचा प्रमुख उद्देश आहे. अमृत भारत एक्सप्रेसमधील सर्व डबे नॉन-एसी असणार असून, प्रीमियम ट्रेनच्या तुलनेत या गाड्यांचे भाडे तुलनेने कमी ठेवले जाणार आहे.

धनबाद-कोयंबटूर अमृत भारत एक्सप्रेस धनबादपासून कोयंबटूरपर्यंत धावणार असून गया, प्रयागराज, कटनी, जबलपूर, इटारसी, नागपूर, वारंगल, विजयवाडा, नेल्लोर, रेनिगुंटा, सालेम आणि तिरुप्पूर यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. तर प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेसला साप्ताहिक सेवा म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. या गाडीचा मार्ग सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ आणि कल्याणमार्गे असेल. तसेच प्रयागराज-उधना अमृत भारत एक्सप्रेस फतेहपूर, कानपूर, इटावा, आग्रा, गंगापूर सिटी, कोटा, रतलाम आणि वडोदरा मार्गे उधनापर्यंत जाणार आहे.

याशिवाय सूबेदारगंज-लोकमान्य टिळक टर्मिनस, गोरखपूर-दिल्ली, गोरखपूर-बांद्रा टर्मिनस आणि चारलापल्ली-गोरखपूर या तीनही साप्ताहिक सेवांना मंजुरी मिळाली आहे. या गाड्यांमुळे उत्तर भारतातील शहरांचा मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि दक्षिण भारताशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

विशेष म्हणजे, गोरखपूर-बांद्रा ट्रेनमुळे उत्तर प्रदेशातील प्रवाशांना मुंबईपर्यंत थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल. तर चारलापल्ली-गोरखपूर सेवेमुळे तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अनेक शहरांना फायदा होणार आहे. या नव्या गाड्या सुरू झाल्यानंतर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना आणखी एक स्वस्त आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, २२ वर्षीय इंजिनिअरचा घाबरून मृत्यू; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसची रॅली

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

SCROLL FOR NEXT