Delhi Services Bill Saam TV
देश विदेश

Delhi Ordinance Bill: राज्यसभेत आज मांडले जाणार दिल्ली सेवा विधेयक; मोदी सरकारची अग्निपरीक्षा

Latest Update on Delhi services bill : BJD ने भाजपला दिलेल्या समर्थनामुळे विधेयक संमत करून घेण्यास भाजपाला अडचण नाहीये.

साम टिव्ही ब्युरो

Update on Delhi Ordinance Bill:

बहुमताच्या जोरावर लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर केल्यानंतर आज ते विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विधेयक मांडणार आहेत. BJD ने भाजपला दिलेल्या समर्थनामुळे विधेयक संमत करून घेण्यास भाजपाला अडचण नाहीये. (Latest Marathi News)

राज्यसभेत आपसह विरोधी पक्षांच्या INDIA गटाने या विधेयकाला विरोध केला आहे. राज्यसभेत भाजपच बहुमत काठावर असल्यामुळे YRS, TDP, BJD यांच्यासारख्या पक्षाच्या जोरावर भाजप हे विधेयक मंजूर करून घेण्याची शक्यता आहे.

मात्र, विधेयकाच्या चर्चेवेळी राज्यसभेत मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस, आप या पक्षांनी आपल्या खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. राज्यसभेतील रणनिती ठरवण्यासाठी आज सकाळी 9.30 वाजता विरोधी पक्षाची मल्लिकार्जुन खरगे यांच्या केबिनला बैठक बोलावण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

पुढची रणनिती आखण्यासाठी काँग्रेसनं ही बैठक बोलवली आहे. तसेच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (INDIA) आघाडीतील अर्व विरोधी पक्ष या बैठकीत हजर राहण्याची शक्यता आहे. यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या खासदारकीचा विषय जोरकसपणे मांडण्यासाठी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दिल्ली सेवा विधेयाकाला राज्यसभेत मंजुरी मिळाल्यास अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भातील सर्व अधिकार हे केंद्र सरकारकडे जातील. तसेच या विधेयकाने दिल्लीतील केजरीवाल सरकारला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे दिल्ली सेवा विधेयकाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: सोमवारपासून या ३ राशींचे नशीब चमकणार, पैसा अन् प्रेमाचा वर्षाव होणार

Maharashtra Live News Update: शेतकऱ्याने घेतले तहसील कार्यालयातच विष; प्रकृती गंभीर

Soft Idli Recipe: इडली फुगतच नाही? बॅटरमध्ये घाला '१' पदार्थ, सॉफ्ट - साऊथ स्टाईल इडलीचं सिक्रेट

BSNL Prepaid Plan: स्वस्तात दमदार ऑफर! बीएसएनएलच्या 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा दररोज 2.5GB डेटा आणि अनेक फायदे

Rule Change : १ ऑक्टोबरपासून ५ नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम, वाचा काय होणार बदल

SCROLL FOR NEXT