Amit Shah News saam tv
देश विदेश

Manipur Clashes: मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना! अमित शाह यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

Amit Shah News: मणिपूर हिंसाचार संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 24 जून रोजी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यादरम्यान मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा केली जाईल.

Shivani Tichkule

Manipur News Update Today: मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचार (Manipur Clashes) अजूनही थांबायचे नाव घेत नाहीये. महिनाभरापेक्षा मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. मणिपूरची स्थिती चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांच्या दौऱ्यानंतर शांततेची आशा निर्माण झाली होती. पण परिस्थिती आणखी बिघडत गेली. (Latest Marathi News)

त्यानंतर आता मणिपूर (Manipur) हिंसाचार संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 24 जून रोजी दिल्लीत (Delhi) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यादरम्यान मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा केली जाईल. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी (21 जून) अधिकृत हँडलवरून ट्विट करून बैठकीची माहिती दिली.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी 24 जून रोजी दुपारी 3 वाजता नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे." मणिपूरमध्ये जवळपास 50 दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना थांबत नाही आहेत. 

मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी या 2 समाजात 3 मे पासून सुरू झालेला हिंसाचार अजूनही सुरू आहे. या ठिकाणी आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 10 हजार घरे जळून खाक झाली आहेत. जाळपोळीच्या 4100 हून अधिक घटना घडल्या आहेत. हजारो लोकांनी भीतीमुळे पलायन केले आहे. शेकडो लोक मिझोराम आणि आसाममध्ये पळून गेले आहेत. सुमारे 50 हजार लोकांना मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.

मणिपूरमधील परिस्थिती कशी आहे?

मणिपूरमध्ये हिंसाचार इतका वाढला आहे की नुकतेच जमावाने केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री आर के रंजन यांचे घर जाळले होते. मणिपूरमध्ये केंद्रीय सशस्त्र दलाच्या 84 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत, आसाम रायफल्सचे 10,000 हून अधिक जवानही तैनात आहेत, लष्करी फौजा रस्त्यावर उतरल्यानंतरही परिस्थिती बिकट आहे.

दरम्यान, एक महिन्यापूर्वी मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायाच्या लोकांमधील वांशिक हिंसाचारात 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर मणिपूरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अफवा पसरू नये म्हणून राज्य सरकारने 11 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली होती आणि इंटरनेट सेवांवर बंदी घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

SCROLL FOR NEXT