Devendra Fadnavis and Amit Shah The week
देश विदेश

Devendra Fadnavis Resign: तुमचे काम सुरू ठेवा, अमित शहांचा फडणवीसांना राजीनामा न देण्याचा सल्ला-सूत्र

Devendra Fadnavis Meet Amit Shah For Resignation: देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसर्‍या भेटीत पूर्ण झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रमोद जगताप, साम प्रतिनिधी

नवी दिल्ली: लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली.आपल्याला पक्षासाठी पूर्णवेळ काम करायचे आहे. त्यामुळे आपल्याला सरकारच्या जबाबदारीमधून मुक्त करावं,अशी विनंती त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली होती.

आज दुपारी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेतल्यानंतर त्यांनी राजीमानाच्या निर्णयासंदर्भात भाजप नेते अमित शहा यांच्याची चर्चा केली. परंतु अमित शहांनी देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. फडणवीस यांना त्यांचे काम चालू ठेवण्याचे सूचना शहा यांनी दिल्यात.

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश आले नाही. ४५ प्लस दावा करणाऱ्या भाजपला अवघ्या १३ जागा मिळाल्यात.या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सरकारमधून आपल्याला मुक्त करावं अशी विनंती त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केली होती. पत्रकार परिषदेत घेत फडणवीस यांनी लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. अपेक्षित यश मिळवून देण्यात आपण कमी पडलो. त्यामुळे सरकारच्या जबाबदारीमधून आपल्याला मोकळं करावं. त्यासाठी आपण उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचंही फडणवीस म्हणाले होते.

राज्याच्या सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णय सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा दोनवेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसर्‍या भेटीत पूर्ण झाली.आज पुन्हा त्यांची भेट घेतली त्यावेळी शहा यांनी त्यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तुमचे काम सुरु ठेवा,शपथविधीनंतर सविस्तर बैठक घेऊ,असेही अमित शाह म्हणालेत.

फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, सध्या तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा.नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करू. महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करूपण तोवर तुम्ही आपले काम सुरु ठेवा, असे अमित शाह यांनी फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात अंगारकी चतुर्थीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, दगडूशेठ गणपती दर्शनासाठी विशेष नियोजन

Rupali Chakankar : वेदनादायक!रक्षाबंधनालाच रूपाली चाकणकरांवर शोककळा, लाडक्या भावाचे निधन

Fraud Case : पाचोऱ्यातील दांपत्याचा अजब कारनामा; उपमुख्यमंत्र्याचा पीए असल्याचे सांगत १८ जणांची फसवणूक

Sayali Sanjeev: सायली संजीवचा कॅज्युअल लूक, PHOTO पाहा

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत मंगळवारी बदल

SCROLL FOR NEXT